JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'आई कुठे काय करते'च्या सेटवर सर्वांची करावी लागली कोरोना टेस्ट; मुख्य अभिनेत्रीच आली पॉझिटिव्ह

'आई कुठे काय करते'च्या सेटवर सर्वांची करावी लागली कोरोना टेस्ट; मुख्य अभिनेत्रीच आली पॉझिटिव्ह

आई कुठे काय करते मालिकेतील एका कलाकाराला (rupali bhosle) कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर सेटवरील सर्व कलाकारांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 जानेवारी- आई कुठे काय करते काय  (Aai Kuthe Kay Karte ) मालिकेच्या सेटवरील काही दिवसापूर्वी एक फोटो समोर आला होता. या फोटोवर सेटवर कशाप्रकारे कोरोना नियमांचे पालन केले जाते हे स्पष्ट दिसत होते. आता या सगळ्या काळजी व काटेकोर नियम पालन केल्यानंतर देखील यातील एका कलाकाराला (rupali  bhosle) कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर सेटवरील सर्व कलाकारांची कोरोना चाचणीकरण्यात आली आहे. रूपालीनं इन्स्टा स्टोरीवर याची माहिती दिली आहे. आई कुठे काय करते मधील संजनाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री रूपाली भोसलेची  **(rupali  bhosle tests positive covid19 )**कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यानंतर तिनं मालिकेतून ब्रेक घेतला आहे. शिवाय ती आता कोरोना नियामाचे पालन करत स्वतःला घरी क्वारंटाइन केले आहे. यानंतर मालिकेच्या सेटवरील सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

आई कुठे काय करते काय मालिकेच्या सेटवरील काही दिवसापूर्वी एक फोटो समोर आला होता. या फोटोवरून एकच समोर आले होतेकी,कोरोना व ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेता मालिकेतील कलाकार कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करत आहेत. मालिकेत काही ज्येष्ठ मंडळी देखील आहे. त्यांच्या तब्यतेची काळजी म्हणून तसेच मालिकेची चित्रीकरण परत बंद पडू नये म्हणून कोरोनाच्या नियमांचे पालन केले जात आहे. या फोटोत आप्पा, यश व अरुंधतीच्या तोंडाला मास्क दिसत होते.

संबंधित बातम्या

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेचा मनोरंजन विश्वाला मोठ फटका बसला होता. याचा परत फटका बसून नये व मालिकिचेचित्रीकरण थांबू नये म्हणून ही काळजी घेतली जात आहे. मात्र शेवटी मालिकेतील एका कलाकाराला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलं आहे. वाचा-मिस्टर & मिसेस मुख्यमंत्री पुन्हा येणार..; सुमी- समर या सिनेमात एकत्र दिसणार मराठी मालिका ‘आई कुठे काय करते’ अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय झाली आहे. ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत सध्या लग्न समारंभाती धूम दिवसांपासून ज्या लग्नाची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती त्या अभिषेक आणि अनघाचा विवाहसोहळा लवकरच पार पडणार आहे. मालिकेत सध्या अभि आणि अनघाच्या लग्नाची धामधूम आहे. याशिवाय मालिका सध्या वेगळ्या वळणावर आहे. या लग्नात अरुंधतीने आपल्या मित्राची बाजू घेत अनिरुद्धला खडसावले आहे. त्यामुळे अरुंधतीमधील हा बदल प्रेक्षकांना देखील आवडत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या