JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / गुलाबी साडी अन् गुलाबी ओठ...रूपालीच्या अदांनी नेटकऱ्यांना लावलयं वेड

गुलाबी साडी अन् गुलाबी ओठ...रूपालीच्या अदांनी नेटकऱ्यांना लावलयं वेड

स्टार प्रवाह वाहिनीवरील अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी मालिका म्हणजे आई कुठे काय करते. या मालिकेती संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले(rupali bhosale) सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक लक्ष वेधून घेत आहे.

जाहिरात

rupali bhosale

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 7 मार्च: टीव्ही (TV)किंवा चित्रपटसृष्टीत (Films) काम करणारे बहुतांश सर्व कलाकार आजकाल सोशल मीडियावर (Social Media) चांगलेच सक्रिय असतात. आपले आकर्षक फोटो, व्हिडिओ शेअर करत असतात. या कलाकारांचे ग्लॅमरस फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. हिंदी चित्रपटसृष्टीतीलच नव्हे तर मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारही यात मागे नाहीत. सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक लक्ष वेधून घेत आहे ती मराठी सृष्टीतील अत्यंत ग्लॅमरस अभिनेत्री रुपाली भोसले (Rupali Bhosale). नुकतेच तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर (Instagram) आपले गुलाबी साडीतले (Pink Saree) काही फोटो शेअर केले आहेत. केसांचा बन, त्यात गुलाबी रंगाचं गुलाबाचं फूल, कानांत सुंदरसे झुमके, पांढऱ्या काठाची गुलाबी रंगाची बनारसी साडी आणि डोळ्यांवर काळा गॉगल असा तिचा हा लूक चाहत्यांना घायाळ करत आहे. या गुलाबी रंगाच्या साडीत तिचं सौंदर्य आणखीच खुलून आलं आहे.

हे फोटो शेअर करताना तिने ‘Pink is always in season’असं कॅप्शन दिलं आहे. लाईफ इज शॉर्ट…लेट माय पल्लू बी लाँग! असंही तिनं एका फोटोला कॅप्शन दिलं आहे. रुपाली साडीसारख्या पारंपरिक पोशाखांपासून ते वेस्टर्न ड्रेसपर्यंत सर्वच प्रकारच्या कपड्यामध्ये ती सुंदर दिसते. याचीच झलक या गुलाबी रंगाच्या साडीमध्येही दिसते. काही दिवसांपूर्वी तिने गुलाबी रंगाच्या परीच्या गाऊनसारख्या पायघोळ ड्रेसमधील फोटो शेअर केले होते. त्यातही ती अशीच मनमोहक दिसत होती.

संबंधित बातम्या

ती नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या लूकमध्ये फोटो शेअर करत असते. प्रत्येक ड्रेसमध्ये तिचं सौंदर्य आणखी खुलून आलंय असं वाटतं. त्यामुळे चाहत्यांनी तिच्या सौंदर्याला भरभरून दाद दिली असून, अवघ्या दोन दिवसांत तिच्या या फोटोंना पाच हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. या फोटोसह तिने काही गाण्यांवरील रील्सही शेअर केले आहेत. झुमका बरेलीवाला, मेरे रश्के कमर या गाण्यावरील तिच्या रील्सना चाहत्यांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. मेरे रश्के कमर या गाण्यावरील तिच्या रीलला 13 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

जाहिरात

रुपाली भोसले सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay karate) या मालिकेत संजनाची भूमिका साकारत आहे. या मालिकेतील मुख्य नायिका असलेल्या अरुंधतीच्या विरोधात असलेली संजना ही खलनायकी थाटाची भूमिका आहे. रुपालीच्या या भूमिकेला रसिकांची चांगलीच दाद मिळत आहे. रुपाली अनेक वर्षं चित्रपटसृष्टीत काम करत आहे. मराठीबरोबरच हिंदी मालिकांमध्येही तिने काम केलं आहे. बिग बॉस मराठीमुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली. तिच्या लोकप्रियतेत संजनाच्या भूमिकेनं आणखी भर घातली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या