JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री चुलीवर भाजतीये भाकऱ्या, Video होतोय व्हायरल

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री चुलीवर भाजतीये भाकऱ्या, Video होतोय व्हायरल

आई कुठे काय करते या मालिकेतील अभिनेत्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ही अभिनेत्री चुलीवर भाकरी करताना दिसत आहे.

जाहिरात

ashwini mahangade

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 मे- आई कुठे काय करते मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराचा सोशल मीडियावर एक वेगळा चाहता वर्ग आहे. या मालिकेतील अभिनेत्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ही अभिनेत्री चुलीवर भाकरी करताना दिसत आहे. अनेकांनी या अभिनेत्रीचं कौतुक देखील केलं आहे. कोण आहे ही अभिनेत्री, याचा उलगडा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर होईल. ही अभिनेत्री म्हणजे दुसरी तिसरी कोण नसून सर्वांची लाडकी अनघा म्हणजेच अश्विनी महांगडे होय. अश्विनीचं सध्या तिच्या महाराष्ट्र शाहीर सिनेमात सांगितलेल्या भूमिकेमुळं कौतुक होत आहे. अशातच अश्विनीचा एका व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत अश्विनी चुलीवर भाकरी करताना दिसत आहे. अश्विनीनं इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की, अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर,आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर - बहिणाबाई.. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांने देखील कमेंटि करत तिचे कौतुक केलं आहे. एका चाहत्यानं म्हटलं आहे की,झाड कितीतरी उंचावर डोलवत असलं तरी त्याच्या मुळा या जमिनीमध्ये घट्ट मातीला धरून असतात ☺️☺️हे तुम्ही वारंवार दाखवून देता ताई❤️by the way without makeup khup Chan dista tumhi .. तर दुसऱ्या एका चाहत्यानं म्हटलं आहे की,ताई… खरंच खूप छान … आपली संस्कृती जपणारे आपलं vyaktimatva तर आणखी एका चाहत्यानं म्हटलं आहे की,ही clip पाहिल्यावर कवितेतील एक ओळ आठवली ती म्हणजे " भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली " असे कवी का म्हणतो ?. ..अशा असंख्य कमेंट अश्विनीच्या या व्हिडिओवर आल्य़ा आहेत.

अश्विनीने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या ती ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अनघाची भूमिका साकारत आहे. याआधी अश्विनीने झी मराठीवरून प्रसारित होणाऱ्या ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत राणू अक्का साहेब या भूमिकेत दिसली होती. या मालिकेमुळे अश्विनी घराघरात राणू अक्का म्हणून लोकप्रिय झाली होती.

संबंधित बातम्या

याशिवाय अश्विनीने ‘टपाल’ आणि ‘बॉइज’ या चित्रपटांमध्येही तिने काम केले आहे. अश्विनीची फॅन फॉलोईंग प्रचंड आहे. ती फक्त अभिनेत्रीच नाही तर एक समाजसेविका देखील आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर अश्विनी एक गुणी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सध्या अश्विनी महांगडे तिच्या महाराष्ट्र शाहीर सिनेमामुळं चर्चेत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या