'आई कुठे काय करते' फेम मधुराणीचा खरा नवरा कोण?
मुंबई,18 मे- ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेतून अरुंधती अर्थातच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर घराघरात पोहोचली आहे. मधुराणीला या मालिकेमुळे ओळख मिळाली असली तरी ती या इंडस्ट्रीत गेल्या 20 वर्षांपासून कार्यरत आहे. मधुराणीसाठी अरुंधतीपर्यंतचा हा प्रवास दिसतो तितका सोपा नव्हता. इथंपर्यंत पोहोचण्यासाठी अभिनेत्रीच्या पदरात अनेक यशापयश पडले आहेत. अनेकांना माहिती नसेल की,अरुंधतीने आई कुठे काय करते पूर्वीसुद्धा अनेक मालिका,जाहिराती आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे.आज आपण अरुंधती म्हणजेच मधुराणीबाबत अशाच काही माहिती नसलेल्या गोष्टी जाणून घेणार आहोत. सध्या छोट्या पडद्यावरील आघाडीची नायिका असलेली अरुंधती शालेय वयात फारच हुशार विद्यार्थीनी होती.मधुराणीला दहावीत 89 टक्के मार्क्स मिळाले होते.आपल्या लेकीची शालेय क्षेत्रातील चुणूक पाहून तिने सायन्स घ्यावं अशी तिच्या आईबाबांची इच्छा होती. त्यानुसार तिने ऍडमिशनसुद्धा घेतलं.मात्र तिच्या मनात काही वेगळंच होत. अभिनयाची आवड मधुराणीला शांत बसू देत नव्हती. तिने ही गोष्ट जेव्हा आपल्या कुटुंबियांना सांगितली तेव्हा सर्वांनी तिचं बोलणं मजेत घेतलं. पण कुणाला ठाऊक होतं मधुराणीची ही आवड खरंच तिला एक दिवस आघाडीची नायिका बनवेल. (हे वाचा: Sonalee Kulkarni B’day: ‘ही’ व्यक्ती होती सोनाली कुलकर्णीचं पहिलं प्रेम;5 वर्षे रिलेशनशिपनंतर झालेला नात्याचा The End, काय होतं कारण? ) भुसावळमध्ये जन्मलेल्या मधुराणीचं महाविद्यालयिन शिक्षण पुण्यात झालं.महाविद्यालयात असताना मधुराणीने एकांकिकामध्ये काम करायला सुरुवात केली होती. एकांकिकामधील अप्रतिम अभिनय पाहून उपस्थित दिग्गजांनी मधुराणीला ई टीव्ही मराठीवरील ‘पळसाला पाने चार’ या मालिकेत अभिनय करण्याची संधी दिली होती.या मालिकेला फारसं यश मिळालं नाही.मात्र या मालिकेमुळे मधुराणीची वर्णी ‘लेकरू’ या सिनेमात लागली होती.अशाप्रकारे लहान मोठ्या भूमिका साकारत मधुराणीने आपलं एक वेगळं अस्थित्व निर्माण केलं आहे.दरम्यान ‘असंभव’ या मालिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली होती.
मधुराणी ही केवळ अभिनेत्रीच नाही तर ती एक गायिका,कवयित्री, दिग्दर्शिका,संगीतकारसुद्धा आहे.मधुराणीला गायनाचा वारसा तिच्या आईकडून मिळाला आहे.तिची आई एक शास्त्रीय गायिका आहे.अनेकांना जाणून आश्चर्य वाटेल की, मधुराणीने सचिन पिळगांवकर यांच्या ‘नवरा माझा नवसाचा’ या गाजलेल्या चित्रपटात एक महत्वाची भूमिका साकारली होती.यामध्ये ती व्हिडीओ जॉकीच्या मजेशीर भूमिकेत दिसली होती.जी अशोक सराफ यांच्या बाजूला बसलेली असते.यामध्ये मधुराणीचा लुक अतिशय वेगळा आहे.त्यामुळे अनेकांना पहिल्या नजरेत तिला ओळखणं कठीण होत. असं भेटलं खरं प्रेम- खाजगी आयुष्याबाबत सांगायचं तर,मधुराणीने प्रमोद प्रभुलकर यांच्याशी लव्ह मॅरेज केलं आहे. ते एक दिग्दर्शक आहेत.मधुराणी आणि प्रमोद यांची पहिली भेट ‘इंद्रधनुष्य’ या मालिकेच्या सेटवर झाली होती. या मालिकेत ते सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होते. प्रमोद यांनीसुध्दा सायन्स मधून पदवी घेऊन या क्षेत्राकडे आपला मोर्चा वळवला होता. दोघांमधील हेच साम्य त्यांना जवळ आणण्यासाठी पुरेसं ठरलं.यानंतर त्यांच्यात चांगली मैत्ती झाली आणि या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं.पुढे दोघांनीही लग्नगाठ बांधत संसार थाटला.या दोघांना एक मुलगीसुद्धा आहे.मधुराणी आणि प्रमोद एक अभिनय क्लाससुद्धा चालवतात. ज्यामध्ये हृता दुर्गुळेपासून ते शिवानी बावकरपर्यंत अनेक कलाकारांनी अभिनयाचे धडे गिरवले आहेत.
‘आई कुठे काय करते’साठी मधुराणीने दिलेला नकार- सध्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे मधुराणीला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.मात्र अभिनेत्रीने या मालिकेसाठी चक्क नकार दिला होता.यामागचं कारण होतं तिची मुलगी. आपल्या लेकीसोबत जास्तीत जास्त वेळ घालवता यावा. तिची कोणत्याही बाबतीत गैरसोय होऊ नये.म्हणून मधुराणीने मालिका करण्यास नकार दिला होता.परंतु जेव्हा पती प्रमोदला याबाबत समजलं तेव्हा त्याने मधुराणीची समजूत घालत आपण मुलीची काळजी घेतो तू मालिका कर असा सल्ला तिला दिला.आणि इथूनच मधुराणीचं नशीबचं पालटलं.