मुंबई, 3 सप्टेंबर- सध्या मनोरंजनसृष्टीत रिमेकची चलती आहे. मालिका असो चित्रपट किंवा गाणी अलीकडे अनेक रिमेक पाहायला मिळत आहेत. बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि तारा सुतारिया यांच्यावर चित्रित झालेला ‘मसकली 2.0’ हा रिमेक सॉन्ग बुधवारी प्रदर्शित झाला आहे. अनेकांना उत्सुकता होती या रिमेकवर मूळ संगीतकार ए आर रहमान कशी प्रतिक्रिया देतील. परंतु ए आर रहमान या रिमेकवर नाराज असल्याचं दिसून येत आहे. त्यांनी एक ट्विट करत नकळत आपली नाराजी व्यक्त केली आहे. एआर रहमान अशा कलाकारांपैकी एक आहेत. जे फारच कमी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करतात. यावेळी एआर रहमान यांनी ‘मसकली’च्या रिमेकवर स्पष्टपणे प्रतिक्रिया देणं टाळलं. मात्र ओरिजिनल गाण्याबाबत ट्विटरवर त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. त्यांनी एक पोस्ट शेअर करत ओरिजनल गाण्याचा आनंद घेण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. एआर रहमान यांनी ट्विट करत लिहलंय, ‘कोणताही शॉर्ट कट नाही. हे करण्यासाठी आम्ही रात्रीची झोपसुद्धा घेतली नाही. हे गाणं पुन्हा पुन्हा लिहलं गेलं. 200 हून अधिक संगीतकारांनी 365 दिवस समजून विचार करुन अनेक पिढयांना ऐकता येणारं संगीत तयार केलं. दिग्दर्शक, संगीतकार आणि गीतकारांची एक टीम, ज्याला अभिनेते, कोरियोग्राफर आणि चित्रपटातील कलाकारांनी पाठिंबा दिला आहे. खूप प्रेम आणि आशीर्वाद… एआर रहमान. या ट्विटनंतर एआर रहमान यांच्या चाहत्यांनीही त्यांना पाठिंबा दर्शविला आहे. चाहत्यांनी नाराजी व्यक्त करत लिहलंय, ‘जगातील सर्वात अहिंसक व्यक्तीला राग आणण्यासाठी काय करावं लागतं, ते आम्हाला आज कळालं. दुसर्या युजर्सने लिहलंय, ‘एआर रहमान सर आम्ही तुमच्यासोबत आहे. आम्ही फक्त ओरिजनल गाण्याला सपोर्ट करु आणि रिमिक्स आणि रिमेकला विरोध करु’. **(हे वाचा:**
Aamir Khan : आधी माफी, मग Video डिलीट; काय चाललय काय? आमिरवर भडकले नेटकरी
) ‘मसकली’ गे मूळ गाणं 2009 मध्ये आलेल्या ‘दिल्ली 6’ या चित्रपटातील आहे. या चित्रपटात अभिनेता अभिषेक बच्चन आणि सोनम कपूर यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. हे गाणं ए आर रहमान यांनी संगीतबद्ध केलं होतं. हे गाणं प्रसून जोशी यांनी लिहलं होतं आणि मोहित चौहान यांनी गायलं होतं. या गाण्याचं नवं व्हर्जन तुलसी कुमार आणि सचेत टंडन यांनी गायलं असून तनिष्क बागची यांनी संगीत दिलं आहे. मात्र या गाण्यावर आता मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे.