JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / इरफान खानच्या आठवणीत अमिताभ बच्चन भावुक, मुलगा बाबिलला लिहिलं पत्र

इरफान खानच्या आठवणीत अमिताभ बच्चन भावुक, मुलगा बाबिलला लिहिलं पत्र

बॉलिवूड बिग बी अमिताभ बच्चन आपला सहकलाकार इरफान खानची आठवण काढून भावुक झाले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 मार्च-   बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेता इरफान खान  (Irrfan Khan)  या जगात नाही या गोष्टीवर विश्वास ठेवणं त्याच्या कुटुंबाला आणि चाहत्यांना आजही कठीण होतं. चाहते सतत त्याची सोशल मीडियावर आठवण काढून भावुक होत असतात. फक्त चाहतेच नव्हे तर मोठमोठे कलाकारसुद्धा इरफानच्या आठवणीत भावुक होत असतात. नुकतंच बिग बी अमिताभ बच्चन   (Amitabh Bachchan)  यांना इरफानच्या आठवणीत भावुक झालेलं पाहायला मिळालं. बॉलिवूड बिग बी अमिताभ बच्चन आपला सहकलाकार इरफान खानची आठवण काढून भावुक झाले आहेत. आपल्या सहकलाकाराची आठवण ठेवत त्यांनी, अभिनेत्याचा मुलगा बाबिलला एक पत्र लिहिलं आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. बिग बींना इरफानची आठवण झाली तेव्हा त्यांनी मुलगा बाबिलला पत्र लिहून मैत्री ही मृत्यूपेक्षाही मोठी असल्याचं सांगितलं आहे. अमिताभ बच्चन यांनी लिहिलेलं पत्र बाबिलने सोशल मीडियावर शेअर केलं आहे. अमिताभ बच्चन यांचं पत्र- अमिताभ बच्चन यांनी 17 मार्च 2022 रोजी इरफान खानचा मुलगा बाबिलला पत्र लिहिलं आहे. हे पत्र एका सुंदर लेटरहेड पेपरवर प्रिंट केलेलं आहे. ज्यामध्ये अमिताभ बच्चन यांची सही आहे. या पत्रात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अमिताभ बच्चन यांनी लिहिलंय,- ‘माझ्या प्रिय बाबिल, आयुष्य हे क्षणिक आहे आणि मृत्यू विशाल आहे. परंतु मैत्री मृत्यूपेक्षा मोठी आहे. प्रिय व्यक्तींसोबतच्या आठवणी कधीच विसरता येत नाहीत. कधी त्यांची आठवण हसण्यात असते, कधी आनंदात तर कधी दु:खात आठवते. या अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला नेहमी त्यांच्याशी जोडून ठेवतात. तुझे वडील मोठे व्यक्तिमत्व होते. इरफान ज्यांच्या संपर्कात आला ते सर्व लोक याच्याशी सहमत आहेत. त्याची खूप आठवण येते’. असं म्हणत अमिताभ बच्चन भावुक झाले आहेत. 2018 मध्ये इरफान खानला न्यूरोएन्डोक्राइन नावाच्या दुर्मिळ कर्करोगाने ग्रासलं असल्याचं निदान झालं होतं. तेव्हापासून त्याच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्यावर लंडनमध्ये प्रथम उपचार करण्यात आले. त्यानंतर ते भारतात परत आले. परंतु 29 एप्रिल 2020 रोजी इरफानने या जगाचा निरोप घेतला होता. अमिताभ बच्चन आणि इरफान खान यांनी 2015 साली ‘पिकू’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटात त्यांच्यासोबत दीपिका पादुकोणही दिसली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या