मुंबई, 11 मे : देश सध्या कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संकटाशी लढाई देत आहे. संपूर्ण जगामध्ये कोरोनाने हाहाकार माजवला आहे. डॉक्टर, नर्सेस, पोलीस, सफाई कर्मचारी हे सर्व कोरोना कमांडो त्यांचं योगदान या कोरोना विरोधातील लढाईत देत आहेत. अशावेळी या सर्वांचेच मनोधैर्य वाढवण्याचे काम सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वच जण करत आहेत. गाण्यांच्या माध्यमातून अनेकांनी या कोरोना कमांडोंचे आभार मानले आहेत. आता यामध्ये आणखी एका बँडचा समावेश झाला आहे. जागतिक स्तरावर परफॉर्म करणाऱ्या या बँडने भारतीय संगीताचा वापर करत आशेचा आणि शांतीचा संदेश दिला आहे. यामध्ये एकूण 9 देशातील 17 कलाकारांनी भाग घेतला होता. या इव्हेंटचे नेतृत्व म्यूझिक बँड माटीबाणी ((Maatibaani)ने केलं. माटीबाणी एक जागतिक बँड आहे. ज्यामध्ये अनेक कलाकार नवीन संगीत आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची तत्त्व आहेत. या इव्हेंटची सुरूवात भगवान शंकराच्या कर्पूर गौर मंत्राच्या जपाने झाली. यानंतर 17 कलाकारांनी विविध वाद्य वाजवली. ज्यामध्ये व्हायोलिन, गिटार, बासरी यांसारखे अनेक संगीत वाद्यांचा समावेश होता. या उपक्रमातून कोरोनाशी लढण्याासाठी शांती आणि आशेचा संदेश देण्यात आला आहे. (हे वाचा- ‘थोडी इज्जत दिखा, एक सॅल्यूट तो मार’ जितेंद्र जोशीचं वॉरियर्ससाठी दमदार रॅप साँग )
प्रसिद्ध उद्योपती हर्ष गोएंका यांनी या व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी या बँडचे ‘सुंदर’ या शब्दात कौतुक केले आहे. त्याचप्रमाणे इतर अनेक सेलिब्रिटींनी देखील हा व्हिडीओ शेअर केला आहे. (हे वाचा- मोदी सरकारची ही योजना तरुणांंसाठी फायदेशीर, मिळणार 3.75 लाखांची मदत )