JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / सगळ्यांची झालीय बत्ती गुल, पालवीच्या प्रेमात पडलीय पब्लिक फुल! 'टाईमपास 3'च्या टिझरला 24 तासात 1M व्ह्यूज

सगळ्यांची झालीय बत्ती गुल, पालवीच्या प्रेमात पडलीय पब्लिक फुल! 'टाईमपास 3'च्या टिझरला 24 तासात 1M व्ह्यूज

‘टाईमपास 3’ च्या या टिझरला 24 तासात 1M व्ह्यूज मिळाल्या आहेत. नुकतीच हृतानं सोशल मीडिया पोस्ट करत माहिती दिली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 जून : टाइमपास आणि टाइमपास २ (Timepass 2) च्या उत्फुर्त प्रतिसादानंतर रवी जाधव दिग्दर्शित ‘टाईमपास 3’ (Timepass 3) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमाची पहिली झलकच प्रेक्षकांना वेड लावून गेली. हृता दुर्गुळेचा कधीही न पाहिलेला अंदाज पाहायला मिळाला. प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवत सिनेमाचा टिझर काल, 31 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. (Timepass 3 Teaser) आला आहे. ‘टाईमपास 3’ च्या या टिझरला 24 तासात 1M व्ह्यूज मिळाल्या आहेत. नुकतीच हृतानं सोशल मीडिया पोस्ट करत माहिती दिली आहे. ‘टाईमपास 3’ (Timepass 3) चा टिझर रिलीज झाल्यापासून सगळीकडे हृताच्या रावडी लुकची चर्चा रंगली आहे. प्रेक्षकांना ह्रताचा रावडी अंदाज भलताच आवडलेला आहे. कारण 24 तासात या टिझरला 1M व्ह्यूज मिळाल्या आहेत. ह्रता दुर्गुळेने इन्स्टा पोस्ट करत म्हटलं आहे की, पालवीची स्टाईल जितकी कडक तितकाच ‘टाईमपास ३’च्या टीजरचा जलवा पन बेधडक… 1M व्ह्यूज झालेत ना पब्लिक! ते पन फक्त 24 तासात .. येतेय पालवी आणि दगडूची गोष्ट ‘टाईमपास 3’ 29 जुलै 2022 पासून सर्व चित्रपटगृहात… वाचा- कोलकात्तामध्ये KK यांचं निधन झाल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची प्रतिक्रिया टाइमपास 3 ची ही गोष्ट दगडू-प्राजुच्या लग्नानंतरची नाहीये तर त्या आधीची आहे म्हणजे कुमारवयातल्या दगडूची ! आणि या कथेत आला आहे नवा ट्विस्ट ज्याचं नाव आहे ’ पालवी दिनकर पाटील’! टाइमपास ३ च्या टिझरच्या केंद्रस्थानी आहे ही डॅशिंग पालवी ! जी साकारली आहे लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने. याशिवाय प्रथमेश परबचा दगडू आणि वैभव मांगले यांचा माधव लेले उर्फ शाकाल हे पात्र या टिझरमध्ये दिसत आहेत. आता ही नेमकी गोष्ट काय असणार आहे ? ही पालवी कोण आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे 29 जुलैला प्रेक्षकांना मिळणार आहेत.

संबंधित बातम्या

1 मिनीटे 16 सेकंदाचा आहे टिझर 1 मिनीटे 16 सेकंदाच्या टिझरने धम्माल उडवून दिली आहे. मला वेड लागले प्रेमाचे, फुलपाखरू, ही पोली साजूक तुपातली सारख्या गाण्यांनी मागच्या दोन्ही सिनेमात चांगलीच धमाल उडवून दिली. टाइमपास 3 मध्ये अशीच धम्माल गाणी पाहता येणार आहे. टिझरमधूनच एका गाण्याची झलक पाहायला मिळाली आहे. टाइमपास 3 ची घोषणा झाल्यापासूनच सर्वांना पडलेला एक प्रश्न म्हणजे सिनेमात प्राजू दिसणार का? टिझरमधून तरी प्राजू दिसली नाहीये पण प्राजू दिसणार की नाही याची उत्तरे हळूहळू मिळतच जातील. तूर्तास तिसऱ्या भागाच्या या टिझरने उत्सुकता वाढवली आहे हे निश्चित !

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या