JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / रात्री बाईकवरुन कामावर निघाला अन् सकाळी मृतदेह परतला घरी

रात्री बाईकवरुन कामावर निघाला अन् सकाळी मृतदेह परतला घरी

समीर निघाला खरा मात्र सकाळपर्यंत घरी परत न आल्याने कुटुंब चिंतेत होते

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पनवेल, 10 ऑक्टोबर : पनवेलमधील एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. समीर पाटील असं त्या तरुणाचं नाव आहे. रात्री घरातून कामाला जात असल्याचं सांगून समीर निघाला खरा मात्र सकाळपर्यंत घरी परत न आल्याने कुटुंब चिंतेत होते. मात्र काही वेळानंतर नदीमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला आहे. रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कालिवली गावाजवळ एक मोटरसायकल आढळली. त्या बाईकसोबत काही वस्तू आणि विष स्वरुप रसायन असलेली रिकामी बाटली सापडली आहे. मात्र त्या ठिकाणी संबंधित मोटरसायकल धारक आढळून आलेला नाही. त्या स्पॉट जवळ नदीमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळला असून तरुण पनवेल तालुक्यातील तारा गावाचा असल्याचे समोर आले आहे. J-K कारागृह महासंचालकाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा, नोकराच्या डायरीमधून अनेक गोष्टींचा उलगडा समीर पाटील असे त्याचे नाव आहे. रात्री घरातून कामाला निघालेला समीर परत न आल्याने शोध सुरू झाला आहे. तेव्हा वरील ठिकाणी अपघात ग्रस्त संस्थेच्या काही सदस्यांना हा प्रकार दिसला. यानंतर त्यांनी पोलिसांना कळविले आणि धक्कादायक  प्रकार समोर आला. समीरने नक्की आत्महत्या केली की काय झाले याचा तपास पोलीस करत असून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या