मुजफ्फरनगर, 23 सप्टेंबर : उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सिव्हिल लाईन परिसरातील जनकपुरी परिसरात एका विवाहित महिलेने गळफास घेत आत्महत्या केली. पूजा असे मृत महिलेचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आत्महत्येनंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - 6 महिन्यांपूर्वी पूजाचा विवाह सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जनकपुरी परिसरातील दीपकसोबत झाला होता. लग्नापूर्वी विवाहितेचे टिटवी पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या सोनू नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. पूजाचे लग्न झाले, त्यानंतरही तिचा प्रियकर हा तिच्या सासरच्या मंडळींना सतत फोन करत असे. त्यामुळे घरात कौटुंबिक कलह निर्माण होत होता, असे सांगितले जात आहे. या सर्व प्रकाराला कंटाळून अखेर 21 सप्टेंबर रोजी विवाहित तरुणीने अचानक आत्महत्या केली. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. यानंतर त्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांनी पंचनामा करून महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मात्र, महिलेच्या सासरच्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तीन जणांविरुद्ध भादंवि कलम 306 सह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे. त्याचवेळी मृत महिलेची आई कौशल यांनी सांगितले की, कालपासून तो आमच्या मुलीला फोन करत होता. 5-6 महिन्यांपासून आम्ही टिटवी पोलिस ठाण्यात याबाबत तक्रारही दिली आहे आहे. आता तो पुन्हा फोन करत होता. त्याने आमच्या घरावरही गोळीबार केला होता. तो माझ्या मुलीला मारण्याचा प्रयत्न करत होता. मी त्याला पकडून दिले होते. मात्र, पोलिसांनी त्याला पुन्हा का सोडले, हे समजले नाही. हेही वाचा - Instagram वर स्केच आर्टिस्टसोबत झाली मैत्री, नंतर विद्यार्थिनीसोबत घडलं भयानक कांड तर याप्रकरणी माहिती देताना सीओ सिटी कुलदीप कुमार सिंह यांनी सांगितले की, 21 रोजी सिव्हिल लाईन पोलिस स्टेशन हद्दीतील मोहल्ला जनकपुरी येथे एका 22 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. यामध्ये महिलेच्या कुटुंबीयांनी एका तरुणावर लग्नानंतरही तिचा छळ करत असल्याचा आरोप केला आहे. मृत महिलेशी त्याची आधीच ओळख होती. या प्रकरणी दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येत आहे.