नवी दिल्ली, 14 एप्रिल : देशाची राजधानी दिल्लीतील महिला आयोग (DCW) आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत मसाज पार्लरमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पोलिसांनी एका महिलेला सेक्स रॅकेटच्या जाळ्यातून वाचवलं आहे. Women’s Commission ला याबाबत माहिती मिळाली होती. यानुसार, एका मसाज पार्लरमध्ये अनैतिक व्यवसाय सुरू होता. या तक्रारीत 27 वर्षीय महिलेसोबत दुष्कृत्य केल्याचा प्रयत्न केल्याचा उल्लेख होता. जेव्हा पोलिसांसह महिला आयोगाच्या सदस्या या मसाज पार्लरमध्ये पोहोचल्या तर आतील स्थिती पाहून तेदेखील हैराण झाले. महिलेवर बलात्काराचा प्रयत्न… महिला आयोगाने दिल्ली पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर महिला आयोगाचे काही सदस्यांनी पोलिसांची टीम घेऊन मसाल पार्लरवर धाड मारली. महिलेने आयोगाला पाठवलेल्या तक्रारीत लिहिलं की, ती बेरोजगार आहे. कामाच्या शोधात ‘गेटवे मसाज पार्लर, नीतिका टॉवर, आजादपुर’ (Gateway Massage Parlour, Nitika Tower, Azadpur) येथे आली होती. यानंतर तिला बोलण्यात अडकवून कोल्डींक्समध्ये नशेचं औषध देण्यात आलं. यानंतर ती बेशुद्ध झाली. महिलेला याच अवस्थेत एका खोलीत बंद करण्यात आलं. येथे एक मुलगा आणि मुलगी हजर होते. यांच्या अंगावर एकही कपडा नव्हता. यानंतर खोलीत महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे ही वाचा- ‘माझा पती चारित्र्यहीन, तो…’;लाचखोर अधिकाऱ्याच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा स्वाती मालीवाल यांनी दिल्ली पोलिसांना जारी केली नोटीस.. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल ( Swati Maliwal, President of Delhi Commission for Women ) यांनी दिल्ली पोलिसांना या प्रकरणात नोटीस जारी करीत कारवाईची मागणी केली.
त्या पुढे म्हणाल्या की, स्पा, मसाज पार्लरमध्ये जारी अनैतिक व्यवसायात वारंवार लोकांकडून तक्रार केली जात आहे. आयोगाने दिल्लीत मसाज पार्लरमध्ये जारी केलेल्या देह व्यापाऱ्याच्या अड्ड्यांचा भांडाफोड करण्यात आला आहे. अद्यापही अनेक स्पा मध्ये वेश्याव्यवसाय केला जात आहे. याचा शोध घेतला जात आहे.