JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / प्रेयसी म्हणते,'दोन महिन्यांपूर्वी प्रियकराला मारून पुरलं आता स्वप्नात छळतोय, त्याला बाहेर काढा'

प्रेयसी म्हणते,'दोन महिन्यांपूर्वी प्रियकराला मारून पुरलं आता स्वप्नात छळतोय, त्याला बाहेर काढा'

तरुणीने 7 डिसेंबरला प्रियकराचा खून करून मृतदेह स्वत:च्या खोलीत पुरला होता. त्यानंतर दोन महिने त्याच खोलीत तरुणी राहत होती.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भोपाळ, 19 फेब्रुवारी : एखाद्या गुन्ह्याच्या प्रकरणात तपास करताना पोलिस चक्रावून जातात. गुंतागुंतीच्या घटना आणि साक्षीदाराकडून होणारी दिशाभूल यामुळं प्रकरणाचा उलगडा होणं कठीण होतं. त्यातही गुन्हेगाराने गुन्हा कबूल केल्यानंतरही त्याचा तपास करताना अनेक अडचणी उभ्या राहतात. मध्य प्रदेशातील एका तरुणीने तिच्याच प्रियकराचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. तरुणीने 7 डिसेंबरला प्रियकराचा खून करून मृतदेह स्वत:च्या खोलीत पुरला होता. त्यानंतर दोन महिने त्याच खोलीत तरुणी राहत होती. याबाबत सोमवारी तरुणीने घरच्या लोकांना सांगितलं. आता आपल्याला त्रास होत असून त्याचा मृतदेह बाहेर काढा असं तरुणी म्हणत आहे. याप्रकरणी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तरुणीच्या खोलीतून इंसात मोहम्मद नावाच्या तरुणाचा मृतदेह खणून काढला. मृतदेहाबद्दल माहिती देणारी तरुणी वारंवार तिची साक्ष बदलत आहे. त्यामुळे तरुणाचे शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा खून झाला की आत्महत्या होती याची माहिती मिळेल असं पोलिसांनी म्हटलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंसातची प्रेयसी जानू आणि तिच्या आईला ताब्यात घेण्यात आलं आहे. जानू हैदराबादमध्ये एका कंपनीत काम करत होती. त्याठिकाणी तिची आणि इंसातची ओळख झाली होती. दोघेही सीधीमध्ये कमाच गावात एकत्र राहत होते. त्यानंतर इंसात घरीही एक-दोन वेळा आला होता. मात्र त्याने जानूबद्दल सांगितले नव्हते. जानूने इंसातच्या घरी जाऊन 7 डिसेंबरला त्याला पंख्याला लटकवून मारल्याचं सांगितलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तसंच जानूने इंसातला खोलीत दफन केल्याची माहितीही दिली होती. याशिवाय ती दोन महिने त्याच खोलीत राहत होती. आता मृत प्रियकर स्वप्नात त्रास देत आहे. त्याला बाहेर काढून अंत्यसंस्कार करावी अशी इच्छा असल्याचंही तिने सांगितल्याचा दावा इंसातच्या कुटुंबीयांनी केला आहे. वाचा : 15 व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या, सापडली 2 ओळींची सुसाईड नोट इंसातचा खून की आत्महत्या याचा खुलासा अद्याप झालेला नाही. पोलिसांनी सध्या जानूला ताब्यत घेतलं आहे. पोलिसांना दिलेल्या साक्षीमध्ये जानूने आपलं वक्तव्य बदललं आहे. सुरुवातीला इंसातला मारलं असं सांगणाऱ्या जानूने आता त्याने आत्महत्या केल्याचं म्हटलं आहे. तसंच पोलिसांच्या भीतीने त्याचा मृतदेह खोलीतच दफन केला असंही सांगितलं. सध्या पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. VIDEO पुण्यातला चालत्या बसमधला धक्कादायक प्रकार CCTV कॅमेऱ्यात

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या