सुलतानपूर, 8 जानेवारी : 21 व्या शतकात, तंत्रज्ञानाच्या या युगातही काही जण अंधश्रद्धेला बळी पडून अनेक दुर्दैवी घटना घडत आहेत. यातच आता एक भयानक घटना समोर आली आहे. अंधश्रद्धेतून एका आईने आपल्या 6 महिन्यांच्या चिमुरड्याची हत्या केली. अंधश्रद्धेतून महिलेने ही घटना घडवून आणल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील सुलतानपूरच्या धनऊडीह कुटिया गावात आज रविवारी घडली. हत्येची माहिती मिळताच, पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले. तसेच या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे. या गावातील शिवकुमार यांची पत्नी मंजू उर्फ राधा ही आपल्या 6 महिन्यांच्या मुलाला घेऊन गावाबाहेरील देव ठिकाणी पोहोचली. यादरम्यान मंजूने मुलाचा फावड्याने वार करून खून केला. या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अंधश्रद्धेतून मंजूने ही घटना घडवून आणल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे माहिती मिळताच पोलिसांनी पोहोचून आरोपी आई मंजूला अटक केली. सोबतच या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे. मात्र, पोलिसही या प्रकरणाला अंधश्रद्धेशी जोडून याकडे प्रथमदर्शनी पाहत आहेत. हेही वाचा - काका उठला पुतण्याच्या जीवावर, ऊसाच्या शेतात दिसला तेव्हा… पुण्यातील धक्कादायक घटना पोलीस अधीक्षक सोमेन बर्मा यांनी सांगितले की, आज गोसाईगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपल्याच मुलाचा फावड्याने वार करून खून केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून महिलेला ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अंधश्रद्धेतून हा खून झाल्याचे दिसत आहे. सध्या पोलीस याप्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करत आहेत.