JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / '...नाहीतर माझी बदली होईल' लाचखोरीत पकडलेल्या महिला इन्स्पेक्टरचा खबळजनक दावा

'...नाहीतर माझी बदली होईल' लाचखोरीत पकडलेल्या महिला इन्स्पेक्टरचा खबळजनक दावा

Bribe in Health Department: जयपुरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं एका महिला ड्रग इन्स्पेक्टरला पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं (caught red-handed taking a bribe)आहे. संबंधित महिला इन्स्पेक्टरला अटक होताच तिने लाचखोरी करण्यामागचं खळबळजनक स्पष्टीकरण दिलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जयपूर, 05 मार्च: जयपुरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं एका महिला ड्रग इन्स्पेक्टरला (Woman drug inspector arrest) पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं (caught red-handed) आहे. संबंधित महिला इन्स्पेक्टरला अटक होताच तिने लाचखोरी करण्यामागचं स्पष्टीकरण दिलं आहे. ‘हा पैसा  माझ्या एकटीसाठी घेतला नसून वरपर्यंत हे पैसे द्यावे लागतात. असं न केल्यास आपली बिकानेरला बदली केली जाऊ शकते,’ असंही त्यांनी म्हटलं आहे. सिंधू कुमारी असं रंगेहात अटक केलेल्या आरोपी महिला ड्रग इन्स्पेक्टरचं नाव आहे. त्यांच्याकडे जयपूरमधील 500 मेडिकल स्टोअर्सची तपासणी करण्याची जबाबदारी होती. पण त्या संबंधित 500 मेडिकल दुकानातून दरमहा पाच हजार रुपये वसुली करत होत्या. दहा दिवसांपूर्वी एका मेडिकल स्टोअरवाल्यानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केली. या प्रकरणी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सलग सात दिवस पाठपुरावा केल्यानंतर, आरोपी ड्रग्स इन्स्पेक्टर सिंधू कुमारीला पकडण्यासाठी सापळा रचला. हेही वाचा- अल्पवयीन मुलीचा नग्न VIDEO सोशल मीडियात VIRAL; पुण्यातील खळबळजनक घटना त्यानुसार अधिकाऱ्यांनी लाचखोरीचे पैसे घेऊन जाण्यासाठी सिंधू कुमारी यांना एका हॉटेलमध्ये बोलावलं. याठिकाणी पैसे स्वीकारताना पोलिसांनी तिला रंगेहात पकडलं आहे. आरोपी सिंधू कुमारी या मूळच्या बिहारमधील रहिवासी असून त्या जयपूर येथे कर्तव्यावर होत्या. धक्कादायक बाब म्हणजे ड्रग इन्स्पेक्टर सिंधू कुमारी लाच घेत असताना, वैद्यकीय विभागात एक मिटींग सुरू होती. संबंधित मिटींगसाठी सिंधू कुमारी यांना बोलावण्यात आलं होतं. पण त्यांनी मिटींगला न जाता लाच घेण्यासाठी हॉटेलमध्ये आल्या होत्या. हेही वाचा- हनीट्रॅपमध्ये अडकवून लाखोंना लुटलं; सांगलीत वृद्धासोबत घडला धक्कादायक प्रकार जयपुरमधील सर्वात मोठी वैद्यकीय व्यवसायाची बाजारपेठ असणाऱ्या सेठी कॉलनीची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली होती. याठिकाणी एकूण 500 मेडिकल स्टोअर्स आहेत. त्या ड्रग्स इन्स्पेक्टर असूनही त्यांना वाहन आणि चालक अशा सुविधा देण्यात आल्या होत्या. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचं संकट निर्माण झालं होतं. तेव्हा औषध विभागानं रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा करण्याची संपूर्ण जबाबदारी ड्रग इन्स्पेक्टर सिंधू कुमारी यांच्याकडे दिली होती. पण लाचखोरी प्रकरणात सिंधू कुमारी यांना रंगेहात पकडल्यानं औषध विभागात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांवर देखील कारवाई केली जाणार असल्याची माहिती एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या