JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / अशी ही 'दुर्गा', दारुड्या नवऱ्याला जेलमधून सोडण्यासाठी महिलेचा किळसवाणा धिंगाणा

अशी ही 'दुर्गा', दारुड्या नवऱ्याला जेलमधून सोडण्यासाठी महिलेचा किळसवाणा धिंगाणा

मद्यधुंद नवऱ्याला कोठडीतून सोडवण्यासाठी एक महिला पोलीस ठाण्यात (Police Station) पोहोचली. तिथं पोहोचल्यावर ‘मी दुर्गामाता आहे’, अशी बतावणी ही महिला करू लागली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पाटणा, 8 जुलै : बिहारमधल्या (Bihar) जमुई जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मद्यधुंद नवऱ्याला कोठडीतून सोडवण्यासाठी एक महिला पोलीस ठाण्यात (Police Station) पोहोचली. तिथं पोहोचल्यावर ‘मी दुर्गामाता आहे’, अशी बतावणी ही महिला करू लागली. त्यामुळे पोलीस ठाण्यात विचित्र परिस्थिती निर्माण झाली. पोलीस ठाण्यात काहीशा विचित्र वेषात पोहोचलेल्या या महिलेच्या एका हातात तांदूळ (Rice) तर दुसऱ्या हातात विशेष प्रकारची काठी होती. या महिलेनं पोलीस ठाण्यात जोरदार ड्रामा (Drama) केला. पोलिसांनी तुरुंगात टाकण्याचा इशारा दिल्यानंतर ही महिला शांत झाली. सध्या जमुई जिल्ह्यात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जमुई जिल्ह्यातल्या सिंकदरा पोलीस ठाण्यात एक महिला दुर्गामाता (Durga Mata) असल्याचं भासवत आपल्या मद्यधुंद नवऱ्याला (Husband) कोठडीतून सोडवण्यासाठी पोहोचली. या महिलेच्या एका हातात तांदूळ आणि दुसऱ्या हातात एक विशेष प्रकारची काठी होती. पोलीस ठाण्यात पोहोचताच या महिलेनं ड्रामा करण्यास सुरुवात केली. अचानक आलेल्या या महिलेनं पोलीस ठाण्याच्या आवारात तांदूळ टाकत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यासोबतच पोलिसांनी पतीला तत्काळ सोडावं, अशी मागणी ही महिला करू लागली. मात्र, पोलीस ठाण्यात उपस्थित कर्मचाऱ्यांनी तुरुंगात टाकण्याचा इशारा देताच या महिलेनं तत्काळ गोंधळ थांबवला. पोलिसांनी समजूत काढल्यानंतर ही महिला घरी परतली.

( प्रथमेश परबला झालं काय?; चक्क भररस्त्यात लागला नाचायला! )

मद्यधुंद अवस्थेत असलेल्या व्यक्तीला पकडलं

सिकंदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंचमहुआ मुसहरी येथून पोलिसांनी कार्तिक मांझी (Kartik Manzi) नावाच्या व्यक्तीला अटक करुन कोठडीत डांबलं. कार्तिकला पोलिसांनी पकडलं तेव्हा तो मद्यधुंद अवस्थेत होता. त्याच्या सुटकेसाठी पत्नी संजूदेवी (Sanju Devi) ही दुर्गा माता असल्याची बतावणी करत हातात काठी घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली आणि गोंधळ घालू लागली. पोलीस ठाण्याच्या आवारात पोहोचताच संजूदेवीनं पोलीस अधिकाऱ्यांवर तांदूळ टाकण्यास सुरुवात केली. “माझ्या परवानगीशिवाय कोणतीही गोष्ट होऊ शकत नाही. माझ्या पतीला कोठडीतून बाहेर सोडावं, अन्यथा सर्वांचं नुकसान होईल”, असं ती सांगू लागली. पोलीस ठाण्यात बराच वेळ संजूदेवीचा ड्रामा सुरू होता. त्यानंतर स्टेशनचे प्रभारी जितेंद्र देव दीपक यांनी संजूदेवी आणि तिच्यासोबत आलेल्या इतर महिलांना पोलीस ठाण्याच्या आवारातून बाहेर काढलं. संजूदेवी ही महिला माझ्या अंगात दुर्गामाता येते असं सांगत अनेकदा नाटक करते, असं बोललं जात आहे.

यापूर्वीही घडलीय अशीच घटना

या वर्षी जानेवारी महिन्यात सिकंदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लछुआर गावात एक घटना घडली होती. या घटनेचा व्हिडिओ जोरदार व्हायरल (Viral Video) झाला होता. दारूबाबत माहिती मिळताच छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर एका महिलेनं दुर्गामाता असल्याचं भासवत तलवार आणि त्रिशूळ हातात घेऊन तांडव करत हल्ला केला होता. या महिलेचा ड्रामा पाहून त्यावेळी पोलीस पथक माघारी परतलं होतं. मात्र दुसऱ्या दिवशी पोलीस पथकावर त्रिशूळ आणि तलवारीनं हल्ला करणाऱ्या सुनीतादेवी या महिलेला देशी दारुच्या साठ्यासह अटक करण्यात आली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या