JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / नव्या नवरीचा हट्ट पुरवण्यासाठी बाजारात गेला घेऊन; पुढल्या काही क्षणात बायको अनरिचेबल

नव्या नवरीचा हट्ट पुरवण्यासाठी बाजारात गेला घेऊन; पुढल्या काही क्षणात बायको अनरिचेबल

पत्नीचा हट्ट ‘सर आँखोपे’ म्हणत पतीदेखील नव्या पत्नीला बाजारात घेऊन गेला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पाटना, 23 जून : बिहारमध्ये (Bihar News) एका पत्नीने आपल्या पतीकडे हट्ट केला. पत्नीचा हट्ट सर आँखोपे म्हणत पतीदेखील नव्या पत्नीला बाजारात घेऊन गेला. तिला नव्या बांगड्या हव्या होत्या. अवघ्या सात दिवसांपूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं. नव्या नवरीचे हट्ट पुरवण्यासाठी नवरदेव तिला बाजारात घेऊन तर आला पण ती काही परत आली नाही. चित्रपट स्टाईल नवरी बांगड्यांचं कारण सांगून बाजारात (Bride ran away) तर आली मात्र आपल्या प्रियकरासोबत फरार झाली. नवरदेवाला काही कळायच्या आत दोघेही फरार झाले होते. ही घटना बिहारमधील एका गावातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सात दिवसांपूर्वी यांचं लग्न झालं होतं. दोन्ही पक्षांच्या सहमतीनंतर 14 जून रोजी त्यांचं लग्न झालं. आणि लग्नाच्या एका आठवड्यात नवरी फरार झाली. बांगड्या हव्या होत्या म्हणून… पत्नी फरार झाल्यानंतर पती आपली आई आणि बहिणीला घेऊन पोलीस ठाण्यात गेला. येथे त्याने पत्नी फरार झाल्याची तक्रार दाखल केली. पती विवेकने सांगितलं की, लग्नानंतर 16 जून रोजी लग्नाचं रिसेप्शन झालं. 18 जून रोजी पत्नी माहेरी गेली होती. सोमवारी 21 जून रोजी ती घरी परतली. मंगळवारी पत्नी म्हणाली की, तिला बांगड्या हव्यात. त्यामुळे पत्नीला बांगड्या खरेदी करण्यासाठी आम्ही बाजारात गेलो. काही वेळानंतर पत्नीने माझा हात सोडला आणि समोर उभ्या असलेल्या कारमध्ये बसली. यावेळी तिने लग्नातील दागिनेही घातले होते. नवरदेवाला काही कळायच्या आत ती कार तेथून निघून गेली. यावर विवेकच्या आईने संताप व्यक्त केला. जर तिला प्रियकरासोबत राहायचं होतं, तर लग्न का केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या