JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / पत्नीला आवडल्या नाहीत सलूनमधील सेवा; पतीने बुलडोजर बोलावलं, पैशांच्या बदल्यात कानाखाली लगावली!

पत्नीला आवडल्या नाहीत सलूनमधील सेवा; पतीने बुलडोजर बोलावलं, पैशांच्या बदल्यात कानाखाली लगावली!

या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेजमधून धक्कादायक बाब समोर आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

गुरुग्राम, 5 मार्च : सेक्टर-38 स्थित सलूनमधील सेवा न आवडल्याने अतिक्रमण हटविणाऱ्या टीमकडून दुकान उद्ध्वस्त केल्याचा आरोपी दुकानाच्या मॅनेजरने अभियंत्यावर लावला आहे. मॅनेजरचं म्हणणं आहे की, त्याच्याजवळ पुरावा म्हणून सीसीटीव्ही फुटेजही आहे. सर्व पुरावे पोलिसांकडे देण्यात आले आहेत. संदीप कुमार महरोली दिल्लीत (Delhi) राहणारा आहे. तो गुरूग्राम येथील एका सलूनमध्ये मॅनेजर पदावर काम करतो. त्याने दिलेल्या माहितीनुसार, 4 मार्च रोजी सकाळी साधारण साडे अकरा वाजता पालिकेचे अभियंता राकेश कुमार आपल्या पत्नीसह आले होते. ते आल्यानंतर संदीप आपल्या मालकासोबत बोलला. त्यांना जी सुविधा हव्यात ती द्यावी असं मालकाने सांगितलं. यानंतर राकेशने फेशिअल केलं. पत्नी आणि तिच्यासह आणखी एका महिलेला सलूनमध्येच सोडलं. अभियंत्याच्या पत्नीने मेकअपसाठी सामान मागवलं. त्यावेळी ब्युटीशन म्हणाली की, तोपर्यंत साडी नेसवून देते. मात्र पत्नीला ते आवडल नाही आणि तिने पतीला कॉल केला. थोड्या वेळाने अभियंता आले आणि कर्मचाऱ्यांसोबत शिवीगाळ करू लागले. हे ही वाचा- काँग्रेस नेत्याच्या मुलाच्या लग्नात पोटभर जेवले अन् तब्बल 1200 पाहुणे रुग्णालयात त्यांनी पाच हजार रुपये दिले नाही, मात्र धमकी देऊन निघून गेले. यानंतर पालिकेचे कर्मचारी जीप घेऊन आले आणि सलूनची तोडफोड केली. मारहाणही सुरू केली. सलूनमधील एका कर्मचाऱ्याला कानाखाली मारलं. मॅनेजरने सांगितलं की, या सर्व प्रकरणाचा सीसीटीव्ही फुटेज त्यांच्याजवळ आहे. आणि त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. या प्रकरणात तपास सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या