JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / पत्नी आणि मुलाला खोलीत कोंडलं; सहाव्या दिवशी घडला सुटकेचा थरार

पत्नी आणि मुलाला खोलीत कोंडलं; सहाव्या दिवशी घडला सुटकेचा थरार

आपली पत्नी आणि मुलगा यांना विनाकारण घरात कोंडून ठेवणाऱ्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. आपल्या कृत्यामागचं नेमकं कारण काय होतं, हे सांगायलाही पती तयार नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भोपाळ, 5 जानेवारी: पतीने (Husband) आपली पत्नी (Wife) आणि मुलाला (Son) सलग सहा दिवस (Six days) घरात कोंडून (Locked) ठेवल्याची घटना उघडकीला आली आहे.  माथेफिरू आणि सणकी पतीनं (Psycho husband)  मुलगा आणि पत्नीला मित्राच्या घरात कोंडून ठेवलं होतं.  एक दिवस पती घराबाहेर गेला असता संधी साधत पत्नीनं मदतीची याचना केली आणि नाट्यमयरित्या तिची सुटका झाली. अशी घडली घटना मध्य प्रदेशातील धार भागातील राजगड गावांमधील एका पतीने त्याची पत्नी आणि छोट्या मुलाला घरात कोंडून ठेवलं. काही दिवसांनी हा पती कामानिमित्त घराबाहेर गेला.  सलग सहा दिवस घरात कोंडून ठेवलेल्या पत्नीने स्वतःच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले.  पत्नीनं घराच्या खिडकीतून शेजार्‍यांना हाक मारली आणि आपल्या मैत्रिणीचा नंबर त्यांना दिला.  तिला फोन करण्याची विनंती करा अशी सूचना पत्नीनं शेजाऱ्याकडे केली.  त्यांनी मैत्रिणीला फोन केला आणि  घटनेची कल्पना दिली.   मैत्रिणीने केली सुटका निरोप मिळताच मैत्रिण  सुटकेसाठी धावून आली.  येताना सोबत काही माणसांना देखील ती घेऊन आली.  घरी आल्यानंतर  पण तिनं दरवाजा उघडायला नकार दिला.  त्यानंतर मैत्रिणीने पोलिसांना पाचारण केलं आणि  आणि घटनास्थळी बोलावून घेतलं.  पोलिसांनाही महिलेचा पती  कुलूप काढायला विरोध करत होता.  पोलिसांनी बळाचा वापर करत  त्याला बाजूला केलं आणि घराचं कुलूप तोडून पत्नी आणि मुलाची सुटका केली.   हे वाचा -

पतीविरुद्ध गुन्हा पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.  आपल्या मित्राच्या घरी पत्नी आणि मुलाला ठेवून त्यांना कुलूप लावण्यामागे नेमकं काय कारण होतं याचं स्पष्टीकरण पती देऊ शकला नाही.  त्यामुळे पती माथेफिरू किंवा मानसिक रुग्ण असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.  याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत असून पत्नी आणि मुलगा सध्या सुखरूप आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या