JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / Instagram वर वेल्डरने RTO अधिकारी सांगत तरुणीला ओढलं जाळ्यात अन्..

Instagram वर वेल्डरने RTO अधिकारी सांगत तरुणीला ओढलं जाळ्यात अन्..

अक्षय बाकुडे हा महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील पिंपरी येथील रहिवासी आहे.

जाहिरात

पोलिसांनी पकडलेला आरोपी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

हरदा, 1 जानेवारी : देशात दिवसेंदिवस बलात्काराच्या घटना वाढत आहेत. ऑनलाईन माध्यमांवर ओळख केल्यावर फसवणूक करुन शारिरीक अत्याचाराच्याही घटना घडत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बनावट आरटीओ अधिकाऱ्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना मध्यप्रदेशच्या हरदा जिल्ह्यातील सिविल लाइन पोलीस ठाणे परिसरातील आहे. महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील अक्षय या तरुणाने मध्यप्रदेशच्या हरदा जिल्ह्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाणे परिसरात राहणार्‍या पीडित तरुणीशी प्रथम इन्स्टाग्रामवर मैत्री केली. त्यानंतर हरदा येथून तिला फूस लावून महाराष्ट्रात नेऊन बलात्कार केला. पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने आरोपीचा शोध घेऊन तेथून त्याला अटक केली. नंतर हरदा येथे आणून न्यायालयात हजर करण्यात आले. यानंतर आरोपीची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. सिव्हिल लाइन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अक्षय बाकुडे हा महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील पिंपरी येथील रहिवासी आहे. दोन महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामवर त्याने बनावट आरटीओ बनून हरदा येथील एका अल्पवयीन मुलीशी मैत्री केली होती. नंबर शेअर केल्यानंतर दोघांनी बोलायला सुरुवात केली. एके दिवशी अक्षय हरदा येथे आला आणि या अल्पवयीन मुलीला घेऊन महाराष्ट्रातील अकोटला पोहोचला. तेथे भाड्याने घर घेऊन त्याने पीडितेवर बलात्कार केला. मुलगी बेपत्ता झाल्याने तिच्या नातेवाईकांनी 23 डिसेंबर रोजी सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याआधारे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. पीडितेच्या मोबाईलच्या कॉल डिटेलमध्ये एक नंबर महाराष्ट्र राज्यातील असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तो क्रमांक तपासला असता तो अकोला जिल्ह्यातील आढळून आला. यावर पोलिसांनी तेथे पोहोचून आरोपी तरुणाला अटक केली. पोलिसांनी तरुणाला न्यायालयात हजर केले आणि त्याची रवानगी कारागृहात केली. हेही वाचा -  ऑफिसमधील तरुणीवर आला जीव; पत्नीला सुगावा लागल्याने तिच्यासोबत.. अक्षयची इन्स्टाग्रामवर एका मुलीशी मैत्री करण्याची कहाणी एखाद्या चित्रपटासारखी आहे. आरोपीने आपल्या मोबाईलच्या डीपीवर आरटीओच्या वाहनासह फोटो टाकला होता. हा फोटो दाखवून त्याने पीडितेला आरटीओ अधिकारी असल्याचे पटवून दिले. मात्र, आरोपी अक्षय हा वेल्डिंगचे काम करतो. आरोपीला शोधणे सोपे नसल्याचे पोलिसांनी सांगितले. तो ज्या क्रमांकावरून बोलायचा ते सिम कार्ड त्याच्या आईच्या नावावर नोंदवले गेले होते. पोलिसांनी नंबर लोकेशनच्या आधारे पोलिसांनी अकोट गाठले. मात्र, आरोपी वारंवार लोकेशन बदलून पोलिसांना चकमा देत होता. चार वेळा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी त्याचे लोकेशन ट्रेस करत मोठ्या गॅरेजमध्ये पोहोचून त्याला अटक केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या