पाटना, 29 सप्टेंबर : बेगुसराय आणि खगडियासारखी घटना भागलपूरमधून समोर आली आहे. येथील एका चोराने जमालपूर साहेबजंग पॅसेंजर ट्रेनच्या खिडकीमधून मोबाइल चोरी करताना पळून जाताना पकडण्यात आलं आहे. सध्या या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात एक व्यक्ती धावत्या ट्रेनमध्ये खिडकीला लटकलेल्या अवस्थेत दिसत आहे. यावेळी चोर प्रवाशांकडे मदतीची मागणी करीत आहे. ही घटना घोगा रेल्वे स्टेशनदरम्यान घडली. येथील चोराची एक टोळी मोबाइल चोरून पळ काढत होती. चोरींनी शिव मंदिरात चोरल्या सोना-चांदीच्या वस्तू, पण दानपेटीला हात लावताच… पाहा Video यादरम्यान ट्रेन सुरू झाली. अन्य चोर पळून जाण्यात यशस्वी ठरले, मात्र एका चोराला प्रवाशांनी खिडकीतूनच पकडलं. यानंतर प्रवाशांनी चोराला खिडकीच्या आत खेचण्याचा प्रयत्न करू लागले. यावेळी चोर ट्रेनच्या बाहेर लटकलेला होता. तब्बल 3 किमीपर्यंत हा चोर बाहेर लटकत होता. यावेळी ट्रेनची गती 80 किमी इतकी होती.
ट्रेनची गतीही वाढत होती, प्रवाशी वारंवार चोर चोर ओरडत होते. तर दुसरीकडे चोर वाचवा वाचवा म्हणून ओरडत होता. माझा हात सोडू नका अशी प्रवाशांना विनंती करीत होता. यानंतर प्रवाशांनी चोराला खिडकीच्या आत खेचून घेतलं आणि त्याला धू धू धुतलं. प्रवाशांनी लाथा-बुक्क्यांनी त्याला मारहाण केली. अनेकांनी तर बेल्ट काढून त्याला मारलं.