भोपाळ, 3 मार्च : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) राजगडमध्ये एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यामागील कारण वाचून तुम्हालाही धक्का बसेल. तरुणाच्या पहिल्या पत्नीचा पती त्याला त्रास देत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. हे प्रकरण मांगिलाल आणि त्याचा शेजारील मित्र हेमराजचा आहे. दोघेही एकमेकांच्या पत्नीच्या प्रेमात पडले. मांगिलालने आपल्या पत्नीचं लग्न हेमराजसोबत लावून दिली. यानंतर मांगिललाने हेमराजच्या पत्नीसोबत लग्न केलं तर परिस्थितीत बिघडली. हेमराजने मांगिलालकडून झगडा प्रथेच्या अंतर्गत पैशांची मागणी केली, यानंतर मात्र तरुणाने स्वत:च आयुष्यच संपवलं. मृतच्या चुलत भावाने सांगितलं की, मांगिलाल (25) याचं 2011 मध्ये कृष्णाबाईसोबत लग्न झालं होतं. लग्नाच्या 8 दिवसातच मांगिलालच्या वडिलांचा मृत्यू झाला. यानंतर तो आपल्या पत्नीसह छापीहेडा येथे राहत होता. त्यांना दीड वर्षांची मुलगीही आहे. येथे शेजारी राहणाऱ्या हेमराजसोबत त्याची मैत्री झाली. काही दिवसात हेमराज आणि कृष्णा यांच्यात अवैध संबंध निर्माण झाले. मांगिलालला याबाबत कळालं तर त्याने 2014 मध्ये आपली पत्नी कृष्णासोबत हेमराजचं लग्न लावू दिलं. मांगिललाने झगडा प्रथेनुसार हेमराजकडून दीड लाख रुपये घेतले. यानंतर हेमराज त्याची पत्नी ममता आणि दुसरी पत्नी कृष्णा, दीड वर्षांची मुलगी एकत्र राहत होते. मांगिलाल हेमराजच्या पत्नीच्या प्रेमात.. मांगिलाल आणि हेमराजची पहिली पत्नी ममता यांच्यामध्येही अफेअर सुरू झआलं. हेमराज-कृष्णाच्या लग्नाच्या 2 वर्षांनंतर 2016 मध्ये ममता आणि मांगिलाल यांनी आगरमधील बैजनाथ मंदिरात लग्न केलं. हेमराजला याबाबत कळालं तर मांगिलालने झगडेची रक्कम मागितली. मांगिलाल दीड लाख रुपये देण्यास तयार झाला. मात्र हेमराजने तीन लाख रुपयांची मागणी केली. मांगिलालने पैसे देण्यास नकार दिला तर त्याला व त्याच्या भावाला मारहाण करण्यात आली. मांगिलाल मंगळवारी दुपारी 3 वाजता घरी आला. तो सरळ आपल्या खोलीत गेला. बुधारी सकाळपर्यंत तो खोलीतून बाहेर आला नसल्याचं पाहून कुटुंबीयांनी खिडकीतून डोकावून पाहिलं तर मांगिलालने गळफास घेतला होता. कुटुंबीयांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. हे ही वाचा- पॉर्न पाहून अनैसर्गिक संबंधासाठी दबाव; प्रेग्नेन्सीदरम्यान पत्नीसोबत क्रूर कृत्य काय आहे ‘झगडा’ पद्धत… राजगडमधील कुप्रथा नातरा वा झगडा प्रथा ग्रामीण भागात आजही सुरू आहे. या प्रथेनुसार, जर पत्नी आपल्या पत्नीला सोडून निघून गेली तर पती झगडा मागतो. झगडा प्रथेअंतर्गत समाजाच्या पंचायतीमध्ये पतीला देण्यासाठी काही रक्कम ठरवण्यात येते. पैसे मिळेपर्यंत पती पत्नीच्या गावातील नागरिकांना त्रास देतो, भांडण करतो.