JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / सेल्फीच्या वेडापायी डॅममध्ये उतरले 3 मित्र; अचानक पाणी वाढलं अन् झाली भयंकर अवस्था!

सेल्फीच्या वेडापायी डॅममध्ये उतरले 3 मित्र; अचानक पाणी वाढलं अन् झाली भयंकर अवस्था!

सेल्फीचं वेड जीवघेणं ठरू शकतं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोरबा, 19 फेब्रुवारी : छत्तीसगडच्या (Chattisgarh News) कोरबामध्ये मचाडोलीमध्ये मिनी माता बांगो डॅममध्ये पिकनिकसाठी तीन मित्र पोहोचले. सेल्फी घेण्याच्या नादात तिघेही डॅमच्या गेटजवळ पोहोचले. दरम्यान अचानक डॅमचा एक गेट उघडण्यात आला. त्यामुळे पाण्याचा प्रवाह वाढला. यावेळी तिघांना बाहेर निघणं अवघड झालं. यावेळी डॅमच्या वरच्या भागातील लोकांनी आरडाओरडा सुरू केला आणि 112 वर कॉल करून तेथील परिस्थिती सांगितली. यानंतर पोलिसांनी सर्वात आधी डॅमचा गेट बंद करण्यास सांगितलं आणि त्यानंतर एक लांब रश्शी फेकली. ज्याच्या आधाराने तिघांना वाचवण्यात आलं. हे ही वाचा- डोंबिवली: सोफ्यात सापडलेल्या महिलेच्या हत्येचं गूढ उकललं; चप्पलमुळे आरोपी गजाआड 112 कंट्रोल रूमला याबाबत कळवताच ते घटनास्थळी पोहोचले. यावेळी त्यांनी पाहिलं की. मुलं पाण्यात अडकले होते. रश्शी आणि गावकऱ्यांच्या मदतीने त्यांनी तिनही मुलांना सुरक्षित बाहेर काढलं. यानंतर त्यांच्या पालकांनाही या घटनेची माहिती देण्यात आली. सोबतच पर्यटकांनाही समजूत देण्यात आली. सेल्फीमुळे अनेकदा धोका उद्भवल्याच्या घटना वारंवार समोर येत असतात. त्यामुळे धोक्याच्या ठिकाणी तरी नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. आतापर्यंत सेल्फीच्या वेडापायी अनेकांचा जीव गेला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या