JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / श्रद्धा वालकर खून प्रकरणार येणार चित्रपट, या दिग्दर्शकाने केली घोषणा

श्रद्धा वालकर खून प्रकरणार येणार चित्रपट, या दिग्दर्शकाने केली घोषणा

सध्या संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडाची घटना चांगलीच चर्चेत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

प्रशांत लीला रामदास, प्रतिनिधी नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर : मुंबईतील श्रद्धा वालकर नावाच्या तरुणीची दिल्लीत तिचा प्रियकर आफताब पूनावालाने निर्घृण हत्या केली. हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले होते. गेल्या सहा महिन्यांपासून पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते, अखेर पोलिसांनी या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहे. या घटनेमुळे अवघ्या देशात एकच खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणावर आधारित चित्रपट तयार होणार आहे. हृदय पिळवटून टाकणाऱ्या श्रद्धा वालकर खून प्रकरणावर चित्रपट प्रदर्शित होणार आहे. श्रद्धा वालकर खून प्रकरणाने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. दररोज घडणारे खुलासे वाचून सर्वांनाच धक्का बसला आहे. दरम्यान, निर्माते-दिग्दर्शक मनीष एफ सिंग यांनी श्रद्धा वालकर खून प्रकरणावर चित्रपट बनवणार असल्याची घोषणा करून चित्रपटसृष्टीला आश्चर्याचा धक्का दिला आहे. हेही वाचा -  कुठे तंदुरमध्ये जाळलं, तर कुठे शरिराचे केले तुकडे, देशातील 5 अंगावर शहारे आणणारे हत्याकांड सध्या संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडाची घटना चांगलीच चर्चेत आहे. यात फूड ब्लॉगर आफताब पूनावालाने मे महिन्यात त्याची लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकरची हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून विल्हेवाट लावली. आता या प्रकरणात आफताबला अटक करण्यात आली आहे. आफताबने श्रद्धा वालकरच्या हत्येनंतर मृतदेहाचे 35 तुकडे केल्याचा दावा केला होता, त्याच जंगलातून आतापर्यंत पोलिसांना 10-13 हाडे सापडली आहेत. मात्र तिचं डोकं, कवटी अद्याप सापडलेली नाही. श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबने तिचं बँक अकाउंट अॅप ऑपरेट केले आणि 54,000 रुपये आपल्या खात्यात ट्रान्सफर केले. आफताबने मोठ्या प्रमाणात पाणी वापरल्याचं त्याच्या फ्लॅटच्या 300 रुपयांच्या प्रलंबित पाण्याच्या बिलावरून सिद्ध झालं.

20 मुलींना डेट करत होता आफताब - 

संबंधित बातम्या

आरोपी आफताब अमीन पूनावाला त्याच्या लिव्ह-इन पार्टनरसोबत राहत असताना त्याच्या 20 हून अधिक गर्लफ्रेंड होत्या. ‘बंबल डेटिंग अॅप’च्या माध्यमातून त्याने या मुलींशी मैत्री केली होती, त्यापैकी बहुतेक त्याच्या घरीही आल्या होत्या. अनेकांशी त्याचे जवळचे संबंध बनले होते. हे सर्व आफताबनं श्रद्धासोबत रिलेशनशिपमध्ये असताना केलं. टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार, आफताब पूनावालाने दिल्ली पोलिसांच्या चौकशीदरम्यान हा खुलासा केला आहे. पोलिसांनी ‘बंबल’ या डेटिंग अॅपला पत्र लिहून आरोपीच्या सर्व गर्लफ्रेंड्सची माहिती मागवली आहे. या सर्व मुलींची लवकरच आफताबबाबत चौकशी केली जाऊ शकते, असं सांगण्यात आलं आहे. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे आफताब आणि श्रद्धाचाही भेटही ‘बंबल’ डेटिंग अॅपवरच झाली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या