JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / परीक्षेची तयारी करीत होत्या दोघी बहिणी; वडिलांनी खोलीला आग लावून केली आत्महत्या

परीक्षेची तयारी करीत होत्या दोघी बहिणी; वडिलांनी खोलीला आग लावून केली आत्महत्या

दोन्ही बहिणींसह त्यांच्या वडिलांचाही मृत्यू झाला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

चंदीगड, 20 मार्च : हरयाणामधील (Haryana News) हिसार जिल्ह्यातील मोहब्बतपुर गावात 16 मार्चला दोन बहिणी मोनिका (16) आणि रिंकू (14) यांची हत्या करण्यात आली होती. अद्यापही हत्येचं गूढ कायम आहे. मुलींचे वडील छोटू रामने दोघींची हत्या केल्यानंतर आत्महत्या केली. मात्र दोघींच्या हत्येचं कारण अद्यापही समोर आलेलं नाही. मोनिका 12 वी आणि रिंकू 9 वीत शिकत होती. दोघीही वार्षिक परीक्षेची तयारी करीत होते. नराधम बापाने खोलीत झोपलेल्या चारही मुलांवर पेट्रोल ओतलं आणि आग लावली. यानंतर त्याने तलावात जाऊन आत्महत्या केली. कुटुंबीय आणि गावकरीदेखील या डबल मर्डर आणि आत्महत्या प्रकरणात काहीही सांगायला तयार नाहीत. धक्कादायक म्हणजे कुटुंबीयांनी त्यांच्याविरोधात कोणतीही तक्रार दिलेली नाही. छोटूरामची पत्नीही या प्रकरणात गप्प आहे. हे ही वाचा- हृदयद्रावक! मुलीच्या लग्नाआधी आलं विघ्न; लेकीच्या डोळ्यादेखत पित्याने सोडला जीव गावकऱ्यांनी सांगितलं की, या सर्व प्रकारासाठी आर्थिक कारण असू शकत नाही. कारण ते आर्थिकदृष्ट्या बळकट होते. घटनेच्या वेळी त्याची पत्नी माहेरी गेली होती. घरी चार मुलं आणि त्यांचे वडिल होते. मुलं खोलीत झोपले होते. खोलीतच जळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. यापैकी खुशबू (16) आणि शुभम (12) यांना वाचवण्यात आलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या