भोपाळ, 8 नोव्हेंबर : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सीहोरमधील पोलिसांनी एक मोठा सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. परिसरातील बस स्टँडजवळ एका घरात सेक्स रॅकेट (Sex Racket) बऱ्याच दिवसांपासून सुरू होता. या प्रकरणात 10 जणांना अटक केली आहे. ज्यात 4 मुली, 3 ग्राहक, एक ड्रायव्हर, एक संचालिका आणि एका महिला मॅनेजरचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बस स्टँडजवळ सुरू असलेला सेक्स रॅकेट पकडण्यात आला आहे. पोलिसांनी येथून 10 जणांना अटक केली आहे. हे ही वाचा- मुलाने सोशल मीडियावर शेअर केले असे Photos; बापाला जावं लागलं थेट तुरुंगात भोपाळमधून येत होत्या तरुणी.. सांगितलं जात आहे की, पोलिसांना आधीच या सेक्स रॅकेटची सूचना मिळाली होती. ज्यावर पोलिसांनी रात्री उशिरा छापेमारी केली. ज्या तरुणींना येथून पकडण्यात आलं आहे ते भोपाळमधून येत होत्या. ज्या अनुपमाच्या घरातून सेक्स रॅकेट पकडण्यात आलं आहे, ती स्वत:ला सामाजिक कार्यकर्ता असल्याचं सांगते. अनेक VIP लोकांसोबतचे फोटो फेसबुकवर शेअर करीत होती. एकदा ती शिवसेनेकडून पालिका निवडणूक देखील लढली होती. ज्यात तिचा पराभव झाला होता. सध्या पोलीस या प्रकरणात तपास करीत असून यातून मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे. आज तक ने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. एका समाज सेविकेच्या घरात सेक्स रॅकेट सुरू असल्याचं वृत्त समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरू केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून येथे सेक्स रॅकेट सुरू होता. पोलीस या प्रकरणात अधिक तपास करीत आहे. यातून मोठा खुलासा होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.