उमरी, 11 फेब्रुवारी : हळद लागण्यापूर्वीच नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी नांदेश येथील उमरी येथून समोर आली आहे. मुलीच्या लग्नासाठी घरात जय्यत तयारी सुरू होती. अशाच नववधुने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. मृत मुलीचे नाव दुर्गा काचवार असून ती 20 वर्षांची होती. मिळालेल्या माहितीनुसार शहरातील व्यंकटेशनगर भागात राहणारे संजय गणेशराव काचवार राहतात. ते किरकोळ किराणा व्यावसायिक असून दुर्गा ही त्यांची एकूलती एक मुलगी आहे. हिचा काही दिवसांपूर्वी नांदेड येथील मध्यमवर्गील कुटुंबातील मुलीशी लग्न ठरलं होतं. 14 फेब्रुवारी रोजी विवाह होणार होता. व्हेलेंनटाइन डे दिवशी लग्न असल्याने दोन्ही घरांमध्ये लग्न खरेदीची धामधूम सुरू होती. हे ही वाचा- ‘दिवसा घरकाम, रात्री कॉलसेंटर’;रिक्षाचालकाच्या लेकीने पटकावला सौंदर्यवतीचा किताब दुर्गाच्या कुटुंबाची खरेदी सुरू होती. गुरुवारी अमावस्या असल्या कारणाने एक दिवस हळदीचा मंडप टाकायचं ठरलं होतं. त्यासाठी मंडपाचं सर्व साहित्यही आणून ठेवले होते. काही गोष्टी राहिल्या असल्याने ते खरेदी करण्यासाठी शहरात गेले होते. घरात केवळ दुर्गा व तिचे वडील थांबले होते. सर्व आल्यानंतर हळदीचा मंडप उभा करण्यात येणार होता. तेवढ्याच वडिलांनी चहासाठी मुलीला आवाज दिला. मात्र दुर्गाने काहीच आवाज दिला नाही. यानंतर तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बाब समोर आली. हे कळताच कुटुंबीयांना जबरदस्त धक्काच बसला.