बागपत 6 जून: प्रेमात वेडी झालेली माणसं काहीही करायला तयार असतात. याचा अनुभव उत्तर प्रदेशातल्या बागपतमध्ये आला आहे. प्रियकरासोबत लग्नाला कुटुंबीयांनी विरोध केल्याने एका तरुणीने असा ही प्लान केला की पोलिसांनाही धक्का बसला. त्या तरुणीने आपल्या पालकांवरच गंभीर आरोप लावत सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला. मात्र पोलीस चौकशीत तिचं बिंग अखेर फुटलं. बागपत मधल्या तरुणीचं एका तरुणावर प्रेम होतं. काही वर्ष प्रेमाच्या आणाभाका खाल्ल्यानंतर त्यांनी अखेर लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र मुलीच्या कुटुंबीयांनी या लग्नाला विरोध केला. तर कुठल्याही परिस्थितीत त्याच मुलाशी लग्न करण्याचा तिचा निर्धार होता. त्यामुळे तिने एक व्हिडीओ तयार करत सोशल मीडियावर व्हायरल केला. आपले आई-वडिल हे पाच लाख रुपयांमध्ये आपला सौदा करत असल्याचं तिने त्या व्हिडीओमध्ये सांगितलं. तसच यातून सुटका करा अशी विनंतीही लोकांना केला. हा व्हायरल झालेला व्हिडीओ पोलिसांपर्यंत पोहोचला आणि पोलिसांनी त्या मुलीची तातडीने चौकशी करत तिला वेगळं ठेवलं. नंतर जेव्हा त्यांनी चौकशी केली तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्या व्हिडीओत तिने सांगितलेली सर्व माहिती ही खोटी असल्याचं पोलिसांना आढळून आलं. केवळ त्या तरुणाशी लग्न करण्यासाठी तिने हा बनाव केला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. हे वाचा - जावयानं सासूला ट्रॅक्टरनं चिरडलं, परस्पर पुरला मृतदेह; धक्कादायक प्रकार उघड वाढदिवसालाच सराईत गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात, एक्स्प्रेस वेवर अटकेचा थरार