JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / बाथरूममधून पत्नीचा आवाज ऐकून पतीही धावला; दोघांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ!

बाथरूममधून पत्नीचा आवाज ऐकून पतीही धावला; दोघांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ!

पत्नीला वाचवायला गेलेल्या पतीचाही यात मृत्यू झाला. धक्कादायक घटना…

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लखनऊ, 11 जून : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) चिनहट पोलीस ठाणे हद्दातील धौकलपुर गावात राहणारे मोहित यादव (45 वर्ष) प्रापर्टी डीलिंगचं काम करीत होते. कुटुंबात त्यांची पत्नी रानी यादव (35 वर्ष) दोन मुली, एक प्रिया (13 वर्ष) आणि दुसरी सीवी (7 वर्ष) आहे. मोहित एकत्र कुटुंबात राहत होता. त्यांच्यासोबत येथे चार लहान भाऊदेखील राहतात. शुक्रवारी दुपारी मोहित यांची पत्नी रानी बाथरूममध्ये अंघोळीसाठी गेली होती. मात्र ती मोटर बंद करायला विसरली होती. तिने बाथरूममध्ये जाऊन नळ उघडला तर तिला शॉक बसला. करंट लागल्यामुळे रानी जोरात ओरडली. तिचा आवाजू ऐकून मोहित धावत बाथरूममध्ये गेले. त्यांनी रानीला वाचवायचा प्रयत्न केला तर त्यांनाही करंट लागली. यानंतर कुटुंबीयांनी दोघांनाही रुग्णालयात नेलं. मात्र येथे दोघांनाही (husband and wife death) मृत घोषित करण्यात आलं. कुटुंबीयांना याबाबत सांगताच त्यांचा धक्का बसला. या अपघातामुळे प्रिया आणि सीवी दोघीही अनाथ झाल्या. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. छोट्याशा निष्काळजीपणामुळे मोठा अपघात घडला. रानीने जर मोटर बंद केली असती तर हा अपघाट टळला असता. या घटनेनंतर परिसरातून दु:ख व्यक्त केलं जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या