JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / सहलीमध्ये शिक्षकाचे विद्यार्थिनीसोबत धक्कादायक कृत्य; गोंदिया हादरले, पोलीस आरोपीच्या मागावर

सहलीमध्ये शिक्षकाचे विद्यार्थिनीसोबत धक्कादायक कृत्य; गोंदिया हादरले, पोलीस आरोपीच्या मागावर

गुन्हा दाखल झाल्यानंतर शिक्षक फरार झाला असून, त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

गोंदिया, 12 जानेवारी : गोंदिया जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शैक्षणिक सहलीदरम्यान बसमध्ये एका शिक्षकाने विद्यार्थिनीची छेड काढल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारानं खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पालकांच्या तक्रारीवरून गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव पोलिस स्टेशनमध्ये संबंधित शिक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील गोलीवार (54) असं विनयभंग करणाऱ्या या शिक्षकाचं नाव आहे. दरम्यान गुन्हा दाखल होताच हा शिक्षक फरार झाला असून, त्याचा शोध सुरू असल्याची माहिती आमगाव पोलिसांनी दिली. सहलीवरून परतताना विनयभंग   घटनेबाबत अधिक माहिती अशी की,  आमगाव तालुक्यातील एका शाळेची शैक्षणिक सहल ही स्लीपर कोच बसने पचमढी येथे गेली होती. दरम्यान, सहल पूर्ण करून परत येत असताना 4 जानेवारीला रात्री नऊ वाजता बसमधील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक झोपी गेल्यावर या शिक्षकाने 15 वर्षीय विद्यार्थिनीला बसच्या मागील सीटवर बोलाविले. तिला विज्ञान विषयाचा अभ्यास करण्याच्या बाहाण्याने बसच्या मागील सीटवर बोलवण्यात आले. त्यानंतर या शिक्षकाने या विद्यार्थिनीचा विनयभंग केला.

गुन्हा दाखल   दरम्यान सहलीवरून परत आल्यानंतर हा प्रकार पीडित विद्यार्थिनीने तिच्या आई-वडिलांना सांगितला. घडलेला प्रकार ऐकूण त्यांनाही धक्का बसला. त्यानंतर पालकांनी आमगाव पोलीस स्टेशन गाठून आरोपी शिक्षक सुनील गोलीवार याच्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार दिली. पालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित शिक्षकाविरोधात  भादंविच्या कलम 354(अ) भादंवि 8,12 बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदाअंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. गुन्हा दाखल झाल्याची माहिती होताच हा शिक्षक फरार झाला आहे. आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या