JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / गर्लफ्रेंडने नशेत असलेल्या बॉयफ्रेंडचा Private Part कापून टॉयलेटमध्ये केला फ्लश

गर्लफ्रेंडने नशेत असलेल्या बॉयफ्रेंडचा Private Part कापून टॉयलेटमध्ये केला फ्लश

गर्लफ्रेंड एवढ्यावरच थांबली नाही, तर तिने कापलेला प्रायव्हेट पार्ट पुन्हा जोडला जाऊ नये, त्यासाठी तिने कापलेल्या पार्टचा भाग टॉयलेटमध्ये फ्लश केला.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 4 एप्रिल : कधी-कधी कोणीही कसाही सूड उगवू शकतं, असाच एक प्रकार समोर आला आहे. तायवानमधील एका गर्लफ्रेंडने तिचा बॉयफ्रेंड तिच्यासोबत चिट करत असल्याचा आरोप केला. त्याला अनेकदा समजावूनही तो सुधारण्याचं नाव घेत नव्हता. अशात त्या गर्लफ्रेंडने तिच्या बॉयफ्रेंडला अतिशय भयानक शिक्षा दिली आहे. गर्लफ्रेंडने, तिचा बॉयफ्रेंड झोपल्यानंतर त्याचा प्रायव्हेट पार्टच कापून टाकल्याची धक्कादायक घटना घडली. ती गर्लफ्रेंड एवढ्यावरच थांबली नाही, तर तिने कापलेला प्रायव्हेट पार्ट पुन्हा जोडला जाऊ नये, त्यासाठी तिने कापलेल्या पार्टचा भाग टॉयलेटमध्ये फ्लश केला. बॉयफ्रेंडला समजलंच नाही - मिररने दिलेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण तायवानमधील चंघुया काउंटीमध्ये असणाऱ्या शिहू टाउनमधील आहे. येथे राहणाऱ्या हुआंग नावाच्या एका व्यक्तीने रात्री अतिशय मद्यप्राशन केलं होतं. त्यानंतर तो बेशुद्ध होऊन झोपला. परंतु सकाळी जेव्हा तो उठला, त्यावेळी अंथरुणावर सर्वत्र रक्त पसरलेलं होतं. तो रक्त पाहून घाबरला आणि त्यावेळी त्याला प्रायव्हेट पार्टच्या जागी दुखत असल्याची जाणीव झाली आणि प्रायव्हेट पार्ट गायब झाल्याचं समजलं.

(वाचा -  शारीरिक संबंधासाठी नकार दिल्यानं प्रेयसीची हत्या; इमारतीवरून पडल्याचा रचला बनाव )

काही वेळात त्याला गोष्टी समजल्यानंतर, त्याच्या गर्लफ्रेंडनेच फुंगने त्याचा प्रायव्हेट पार्ट कापल्याचं कळल्यानंतर तो हैराण झाला. बॉयफ्रेंडला अद्दल घडवण्यासाठी उचललं पाउल - गर्लफ्रेंड फुंगने सांगितलं की, हुआंग तिच्यासोबत चिट करत होता. तो दुसऱ्या महिलेसोबत राहत होता. अशात तिने हुआंगला अद्दल घडवण्यासाठी हा निर्णय घेतला. सध्या फुंगला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तिची चौकशी सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या