JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / शाळेच्या ड्रेस कोडने घेतला जीव? मैत्रिणीशी बोलताना अचानक कोसळली अन् भयंकर घडलं!

शाळेच्या ड्रेस कोडने घेतला जीव? मैत्रिणीशी बोलताना अचानक कोसळली अन् भयंकर घडलं!

राजकोटमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 14 वर्षांच्या शाळकरी मुलीचा जमिनीवर पडून अचानाक मृत्यू झाला आहे. या प्रकरणात तिच्या आई वडिलांनी शाळा प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 19 जानेवारी :  देशभरात सध्या कडाक्याची थंडी पडली आहे. अनेक राज्यांमध्ये कडाक्याच्या थंडीसह दाट धुकही दिसत आहे. ही बाब आरोग्यासाठी त्रासदायक ठरत आहे. थंडीमुळे हार्ट अ‍ॅटॅकच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. लहान मुलं आणि तरुणांनाही अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे. गुजरातमधील राजकोटमध्ये अशीच एक घटना घडली आहे. एका 14 वर्षांच्या शाळकरी मुलीचा जमिनीवर पडून अचानाक मृत्यू झाला आहे. मुलीचा मृत्यू कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे झाला, असं शाळा प्रशासनाचं म्हणणं आहे तर, दुसरीकडे शाळेच्या ड्रेस कोडमुळे या मुलीचा जीव गेल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.  थंडीमुळे मृत्यूचा अंदाज   मिळालेल्या माहितीनुसार, राजकोटमधील ए. व्ही. जसानी विद्या मंदिर शाळेत मंगळवारी सकाळी 7 वाजून 25 मिनिटांनी ही घटना घडली. आठवी इयत्तेत शिकणाऱ्या रिया सागर या विद्यार्थिनीचा थंडीमुळे मृत्यू झाल्याचं नातेवाईकांनी सांगितलं. कडाक्याची थंडी असूनही शाळा प्रशासनाने मुलांना त्यांच्या आवडीचे उबदार कपडे घालू दिले नाहीत. मुलांना फक्त युनिफॉर्म स्वेटर घालण्याची परवानगी होती, असं नातेवाईकांनी म्हटलं आहे.   ‘मुलांना उबदार कपडे घालण्याची परवानगी द्या’  शाळेच्या संचालकांनी सांगितले की, हृदयविकाराच्या झटक्यानं रिया सागरचा मृत्यू झाल्याचं दिसतं आहे. तर, रियाची आई जानकी सागर म्हणाल्या की, शाळेचा युनिफॉर्म स्वेटर घालून मुलं थंडीपासून आपला बचाव करू शकत नाहीत. शाळेनं विद्यार्थ्यांना उबदार कपडे घालण्याची परवानगी द्यावी. माझ्या मुलीला कोणताही आजार नव्हता. थंडीमुळे हृदयात रक्त गोठल्यानं तिचा मृत्यू झाला आहे. हेही वाचा :   कॉलेज संपवून घरी जात होत्या दोघी, तेव्हाच वाटेत….एकीची प्रकृती गंभीर; राजापूर हादरलं! रुग्णालयात दाखल केले पण..  पोस्टमॉर्टमनंतरच मुलीच्या मृत्यूचं नेमकं कारण समजेल, असं जिल्हा शिक्षणाधिकारी बी.एस.कैला यांनी सांगितले. ते म्हणाले, “सकाळी 7 वाजून 25 मिनिटांच्या सुमारास रिया तिच्या मैत्रिणींशी शाळेच्या लॉबीमध्ये गप्पा मारत होती. बोलताना ती अचानक खाली पडली. शाळेपासून 100 मीटर अंतरावर एक हॉस्पिटल आहे. रियाला तातडीनं त्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं. पण, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. डॉक्टरांनी प्रथमदर्शनी मृत्यूचं कारण हार्ट अ‍ॅटॅक असल्याचं सांगितलं आहे. मात्र पोस्टमॉर्टेम अहवालानंतर मृत्यूचं खरं कारण समोर येईल.” कैला असंही म्हणाले की, सकाळी आठ वाजल्यानंतर शाळा उघडण्याचे निर्देश शाळा प्रशासानांना दिले आहेत. मुलांना शाल, मफलर, जॅकेट इत्यादी घालण्याची परवानगी द्यावी. हे नियम 21 जानेवारीपर्यंत लागू राहणार आहेत. थंडी आणखी वाढल्यास 27 जानेवारीपर्यंत यामध्ये मुदतवाढ दिली जाऊ शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या