JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / हातात बांगड्या, कपाळावर टिकली; महिलांप्रमाणे सजून दहावीच्या विद्यार्थ्याने स्वत:चाच घेतला जीव

हातात बांगड्या, कपाळावर टिकली; महिलांप्रमाणे सजून दहावीच्या विद्यार्थ्याने स्वत:चाच घेतला जीव

पश्चिम बंगाल राज्यातल्या सिलिगुडीमध्ये दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने कुटुंबीय घराबाहेर गेल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सिलिगुडी, 13 डिसेंबर : पश्चिम बंगाल राज्यातल्या सिलिगुडीमध्ये दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने कुटुंबीय घराबाहेर गेल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. धक्कादायक म्हणजे, एखाद्या विवाहितेप्रमाणे त्याने साडी नेसली होती. त्याच्या हातात बांगड्या व चेहऱ्यावर मेकअपही दिसत होता. मुलगा फासावर लटकल्याचं पाहून शेजाऱ्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. त्यांनी तत्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिस घटनास्थळी आले तेव्हा समोरचं दृश्य पाहून तेही चक्रावले. ‘आज तक’ने या संदर्भात वृत्त दिलं आहे.

पश्चिम बंगालच्या सिलिगुडी शहरात दक्षिण शांतिनगर भागात हा धक्कादायक प्रकार घडला. याची माहिती सिलिगुडी मेट्रोपॉलिटन पोलिसांना शेजाऱ्यांनी दिली होती. आत्महत्या करणारा मुलगा दहावीत शिकत असून तो सध्या परीक्षेची तयारी करत होता. मुलाने आत्महत्या केली तेव्हा त्याचे कुटुंबीय घराबाहेर गेलेले होते. घडलेल्या प्रकाराची माहिती शेजाऱ्यांकडूनच त्यांना मिळाली.

हे ही वाचा :  पत्नीचे गावातील तरुणाशी अनैतिक संबंध, पोलीस ठाण्याच्या हद्दीतच पतीने उचललं हे पाऊल

संबंधित बातम्या

घरातून ओरडण्याचा आवाज आला अन् शेजाऱ्यांनी घेतली धाव

या घटनेबद्दल बोलताना एका शेजाऱ्याने सांगितलं, की मुलाने गळफास घेतला तेव्हा त्याच्या घरातून मोठ्याने ओरडण्याचा आवाज झाला. तेव्हा शेजारी राहणारे नागरिक तत्काळ त्याच्या घरी पोहोचले. घरातली परिस्थिती पाहून सर्वांनाच धक्का बसला. मुलगा फासावर लटकलेला होता आणि त्याने महिलांप्रमाणे कपडे घातले होते. हातात बांगड्या आणि कपाळावर टिकलीही दिसत होती. समोरचं दृश्य पाहून काय करावं हेच शेजाऱ्यांना कळत नव्हतं. त्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला.

जाहिरात

त्यानंतर पोलिसांचा तपास सुरू झाला. मुलाचे दुसरे एक शेजारी म्हणाले, की या मुलाला याआधी कधीही महिलांचे कपडे घातलेल्या स्थितीत पाहिलं नव्हतं. त्याची अशी आवड होती, असंही कधी जाणवलं नव्हतं. तो मुलगा फारच सभ्य होता. मुलाला कुठलंही व्यसन असल्याचंही कधीही दिसलं नव्हतं, असं निरीक्षण या वेळी नोंदवण्यात आलं.

हे ही वाचा :  मैत्री अन् विश्वासाला काळिमा, पत्नीचा प्रियकर निघाला मित्र, दोघांनी त्याला असं संपवलं

जाहिरात

मुलाचा मृतदेह पाहून शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला आहे. प्रथमदर्शनी हा आत्महत्येचा प्रकार असल्याचं दिसतं. परंतु या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला जात आहे. मुलाने आत्महत्या का केली असावी, त्यामागची कारणं काय आहेत याबाबत कुटुंबीय आणि शेजाऱ्यांशी बोलून, तसंच इतर काही धागेदोरे सापडतात का हे पोलिसांकडून तपासलं जाणार आहे. दरम्यान, आत्महत्या केलेल्या मुलाच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलाच्या भावाचाही काही वर्षांपूर्वी अकाली मृत्यू झाला होता. या घटनेनंतर सिलिगुडीतल्या दक्षिण शांतिनगर भागावर शोककळा पसरली आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या