JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / VIDEO: 'ती रडत आहे'.. स्पाईसजेटची एअर होस्टेस प्रवाशावर संतापली.. ऑन द स्पॉट कारवाई

VIDEO: 'ती रडत आहे'.. स्पाईसजेटची एअर होस्टेस प्रवाशावर संतापली.. ऑन द स्पॉट कारवाई

या संपूर्ण प्रकरणावर स्पाइसजेटकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे.

जाहिरात

स्पाईसजेटची एअर होस्टेस प्रवाशावर संतापली

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 23 जानेवारी : मागील काही दिवसांपासून विमानात सातत्याने वादाच्या घटना समोर येत आहेत. एअर इंडियातील लघवीच्या घटनेनंतर आता स्पाइसजेटच्या फ्लाइटशी संबंधित एक घटना समोर आली आहे, जिथे विमानातील क्रू मेंबर्सनी प्रवाशासोबत गैरवर्तन केल्यानंतर त्याला खाली उतरवले. या संपूर्ण प्रकरणावर, स्पाइसजेटने एक निवेदन जारी केले होते की, 23 जानेवारी 2023 रोजी, स्पाईसजेटचे ओले-लीज्ड कॉरोंडन विमान दिल्ली ते हैदराबादला जाणार होते. एअरलाइनने माहिती दिली की दिल्लीत बोर्डिंग दरम्यान, एका प्रवाशाने बेजबाबदार आणि अनुचित वर्तन केले. केबिन क्रूला त्रास दिला. केबिन क्रूने या घटनेची माहिती पीआयसी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना दिली. क्रूसोबत गैरवर्तन करणाऱ्या प्रवाशाला आणि त्याच्या एका सहप्रवाशाला विमानातून उतरवण्यात आले. यानंतर सुरक्षा पथकाकडे सोपवण्यात आले. याआधीही विमानात प्रवाशांनी गोंधळ घातल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

संबंधित बातम्या

एएनआय या वृत्तसंस्थेने अॅक्सेस केलेल्या व्हिडिओमध्ये एक पुरुष प्रवासी महिला क्रू मेंबरसोबत गैरवर्तन करताना दिसत आहे. प्रवाशाने क्रू मेंबरला अयोग्यरित्या स्पर्श केल्याचा आरोप क्रूने केला आहे. दुसरीकडे विमानात जागा कमी असल्याने ही घटना घडल्याचा दावा सहप्रवाशांनी केला आहे. मात्र, नंतर प्रवाशाने लेखी माफी मागितली.

या महिन्याच्या सुरुवातीला, 9 जानेवारी रोजी, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) एअर इंडियाच्या पॅरिस-नवी दिल्ली फ्लाइट AI-142 मधील प्रवाशांनी केलेल्या गैरवर्तनाच्या दोन घटनांनंतर एअर इंडियाच्या जबाबदार व्यवस्थापकाला कारणे दाखवा नोटीस जारी केली होती. एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये महिलेच्या ब्लँकेटवर लघवी केल्याच्या आरोपाखाली एक प्रवासी अजूनही तुरुंगात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या