JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / आईला वाचवायला लेकाने लावली जीवाचा बाजी; शेवटी दोघांनीही गमावले प्राण

आईला वाचवायला लेकाने लावली जीवाचा बाजी; शेवटी दोघांनीही गमावले प्राण

या घटनेमुळे गावभरात शोककळा पसरली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जयपुर, 6 मार्च : जयपुर (Jaipur News) जिल्ह्यात आज एका मुलाने (Son) आईचा जीव वाचवण्यासाठी (Mother) स्वत:चा जीव दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र तरीही तरुण आपल्या आईला वाचवू शकला नाही. जयपूरमधील चाकसू भागात झालेल्या या धक्कादायक घटनेमुळे (Shocking Incident) आई आणि मुलगा दोघांचा मृत्यू (Death) झाला. पोलिसांनी आई-मुलाचा मृतदेह पोस्टमार्टमनंतर कुटुंबीयांकडे सोपवला आहे. एकुलत्या एका मुलाला गमावल्यामुळे कुटुंबाला जबर धक्का बसला आहे. या घटनेमुळे गावभरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हृदयाचा थरकाप उडवणारी ही घटना जयपूरमधील चाकसू भागातील आहे. आज सकाळी साधारण 10 वाजता गिर्राज (25) आपली आई सोना देवी (48) सह शेतात काम करीत होता. यादरम्यान सोना देवी पाणी आणण्यासाठी शेतातील विहिरीजवळ गेली. येथे पाणी भरताना तिचा पाय घसरला आणि ती विहिरीत पडली. हे ही वाचा- पत्नीला आवडल्या नाहीत सलूनमधील सेवा; पतीने बुलडोजर बोलावलं, पैशांच्या बदल्यात… मुलाने सरळ विहिरीत मारली उडी… यादरम्यान शेतात काम करणाऱ्या गिर्राजचं आईकडे लक्ष गेलं. आईला विहिरीत पडताना पाहून गिर्राज थेट विहिरीच्या दिशेने धावला आणि त्याने लागलीच विहिरीत उडी मारली. मात्र दोघांनाही नशीबाने साथ दिली नाही, आणि या घटनेत दोघांचा मृत्यू झाला. यानंतर गावकरी विहिरीजवळ पोहोचले आणि त्यांना विहिरीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागले. यादरम्यान गावकऱ्यांनी पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी रेस्क्यू टीमला बोलावलं. त्यांनी मिळून दोघांना बाहेर काढलं, मात्र तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता. पोलिसांनी तातडीने त्यांना रुग्णालयात हलवलं. मात्र डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केलं. हे ऐकून गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. मुलाने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता आईसाठी थेट विहिरीत उडी घेतली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या