नवी दिल्ली, 23 सप्टेंबर : दिल्लीत एक खळबळजनक घटना समोर आली आहे. दिल्ली विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थिनीची अश्लील छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका स्केच आर्टिस्टला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद तंजीम अहमद असे अटक करण्यात आलेले आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी दाखल तक्रारीवरून उत्तर दिल्लीतील सायबर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली विद्यापीठाच्या 19 वर्षीय विद्यार्थिनीने उत्तर दिल्लीतील सायबर पोलीस ठाण्यात स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत त्याने सांगितले होते की, फेब्रुवारी 2022 मध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामच्या माध्यमातून मोहम्मद तंजीमसोबत तिची मैत्री झाली होती. तंजीमचे स्केच बनवण्याचे कौशल्य आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील मोठ्या संख्येने फॉलोअर्स पाहून ती प्रभावित झाली, त्यानंतर पीडितेने त्याच्याशी चॅटिंग सुरू केले. यानंतर काही वेळानंतर आरोपीच्या सांगण्यावरून पीडितेने तिच्यासोबतचे तिचे खासगी फोटोही इंस्टाग्रामवर शेअर केले, काही दिवसांनी पीडित मुलगी पहिल्यांदाच आरोपीला भेटली. या भेटीदरम्यान पीडितेने आरोपीचा फोन तपासला त्यात आरोपीने तिचा अश्लील फोटो गुगल ड्राइव्हमध्ये ठेवल्याचे तिला दिसले. पीडितेने तिचा फोन तपासला असता, तिच्या फोनमध्ये इतर अनेक मुलींचे व्हिडिओ आणि फोटो सापडले. त्यानंतर पीडित विद्यार्थिनीने आरोपी मोहम्मद तंजीमसोबतचे संबंध संपवण्याबाबत बोलली. मात्र, आरोपीने पीडितेचे खासगी छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर पीडितेने पोलिसांत तक्रार केली. दिल्ली पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून उत्तर दिल्लीतील सायबर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपासात आरोपीचे सोशल मीडिया अकाउंट तपासले आणि याबाबतची माहिती गोळा करण्यात आली. यानंतर तांत्रिक मदत घेऊन आरोपीची ओळख पटली. आरोपी मोहम्मद तंजीम अहमद हा झारखंडच्या रांचीचा रहिवासी आहे. मात्र, त्याचे लोकेशन दिल्लीतील जामा मशीद परिसरात होते. त्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. कसून चौकशी केल्यानंतर 21 सप्टेंबर रोजी आरोपीला अटक करण्यात आली. हेही वाचा - मिरची पूड डोळ्यांत टाकत 10 लाख लुटीचा डाव, 800 सीसीटीव्ही कॅमेरे आणि… चौकशीनंतर आरोपीने या कृत्यासाठी वापरलेले सिमकार्ड आणि मोबाईल फोनही जप्त करण्यात आला आहे. चौकशीदरम्यान, आरोपीने उघड केले की तो इन्स्टाग्रामवर अधिक फॉलोअर्सच्या माध्यमातून भोळ्या मुलींना आमिष दाखवत असे. त्यानंतर ऑनलाइन रिलेशनशिपनंतर तो मुलींनी त्याला खासगी छायाचित्रे पाठवावी यासाठी प्रयत्न करायचा. जेव्हा कुणी मुलगी त्याला खासगी फोटो शेअर करायची, त्यानंतर तो त्या फोटोला अश्लील फोटोमध्ये रुपांतरीत करायचा, अशी कबुली त्याने दिली.