JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / नार्को टेस्टमध्ये आफताबची कबुली, श्रद्धाचा मोबाईल अन् कपड्यांबाबत दिली महत्त्वाची माहिती

नार्को टेस्टमध्ये आफताबची कबुली, श्रद्धाचा मोबाईल अन् कपड्यांबाबत दिली महत्त्वाची माहिती

दिल्लीतील रोहिणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये आफताबची आज नार्को टेस्ट करण्यात आली.

जाहिरात

श्रद्धा वालकर मृत्यू प्रकरण

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 1 डिसेंबर : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात रोज नवीन काहीतरी घडत आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. आज श्रद्धाच्या हत्येतील आरोपी आफताबची नार्को टेस्ट झाली. या नार्को चाचणीनंतर खुनाच्या संबंधित न सुटलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळाल्याची माहिती समोर आली आहे. याआधी आफताबची पॉलीग्राफ चाचणी पूर्ण झाली आहे. धक्कादायक माहिती समोर - आजच्या या टेस्टकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दिल्लीतील रोहिणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये एफएसएलच्या (न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा) तज्ज्ञ पथकाकडून आफताबची आज नार्को टेस्ट करण्यात आली. या नार्को टेस्टमध्ये आफताबने श्रद्धाच्या हत्येची कबुली दिली आहे. आज झालेल्या या नार्को टेस्टमध्ये आरोपी आफताबने श्रद्धाचा मोबाईल आणि श्रद्धाची जेव्हा हत्या केली, त्यावेळीचे तिचे कपडे कुठे फेकले, याचं उत्तरही दिले. तसेच श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करण्यासाठी कोणती शस्त्रे वापरली आणि ती कुठे फेकली, याचा खुलासाही आफताफने केला. दरम्यान, पोलिसांनी आफताबने सांगितलेल्या ठिकाणाहून श्रद्धाचा मोबाईल आणि कपडे जप्त केले तर या प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळेल, असे मानले जात आहे. आफताबच्या नव्या गर्लफ्रेंडचा वेगळाच खुलासा -  श्रद्धा वालकर  हत्याकांड  उघड झाल्यापासून यात रोज काही ना काही अपडेट येत आहेत. आता आफताबची नवी गर्लफ्रेंड समोर आली आहे. आपला श्रद्धाच्या हत्येशी किंवा तिच्या तुकड्यांशी काहीही संबंध नसल्याचा दावा तिने केला आहे. तरुणीने सांगितले की, जेव्हा ती आफताबच्या घरी त्याला भेटायला यायची तेव्हा आफताबने या घरात श्रद्धाचे तुकडे ठेवले होते याची तिला कल्पना नव्हती. हेही वाचा -  मुंबईच्या रस्त्यावर कोरियन तरुणीसोबत लाज वाटणारे कृत्य, तरुणाने हात पकडला आणि… VIDEO मे महिन्यात श्रद्धाच्या हत्येनंतर आफताबने या नवीन मुलीला डेट करायला सुरुवात केली. दोघांची भेट त्याच बंबल अॅपवर झाली ज्याद्वारे श्रद्धा आणि आफताब यांची भेट झाली. ही नवीन मैत्रीण ऑक्टोबरमध्ये दोनदा आफताबच्या घरी आली होती. 12 ऑक्टोबरला आफताबने तिला अंगठी दिल्याचेही तिने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तिच्याकडून ही अंगठी जप्त केली असून तिचा जबाब नोंदवला आहे. पोलीस तपासात असे समोर आले आहे की, श्रद्धाच्या हत्येनंतर 12 दिवसांनी दोघे 30 मे रोजी संपर्कात आले होते. आफताबची नवी गर्लफ्रेंड मानसोपचारतज्ज्ञ आहे. तिने पोलिसांना सांगितले की, ती ऑक्टोबरमध्ये दोनदा आफताबच्या घरी आली होती, पण तिला कधीच वाटले नाही की या घरात कोणीतरी खून केला आहे किंवा मानवी शरीराचे तुकडे इथे ठेवले आहेत. आफताबच्या चेहऱ्यावर कधीही भिती दिसली नाही, असेही तिने सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या