JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / आता सहज सिद्ध होणार आफताबचा गुन्हा? श्रद्धा वालकर हत्येप्रकरणात पोलिसांना मोठं यश, हाडांचा DNA वडिलांसोबत मॅच

आता सहज सिद्ध होणार आफताबचा गुन्हा? श्रद्धा वालकर हत्येप्रकरणात पोलिसांना मोठं यश, हाडांचा DNA वडिलांसोबत मॅच

मुंबईतील श्रद्धा वालकर या तरुणीच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांना आतापर्यंतचे सर्वात मोठे यश मिळाले आहे

जाहिरात

श्रद्धा वालकर हत्या प्रकरण

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दिल्ली, 26 नोव्हेंबर : काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये आफताब पूनावाला नावाच्या व्यक्तीनं आपली लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकर हिची निर्घृण हत्या करून तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केल्याची भयानक घटना समोर आली होती. श्रद्धाच्या हत्या प्रकरणातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याची सध्या कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात दिल्ली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांना मोठे यश - मुंबईतील श्रद्धा वालकर या तरुणीच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांना आतापर्यंतचे सर्वात मोठे यश मिळाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धाचे वडील मदन विकास वालकर यांच्याशी डीएनए जुळला आहे. यानंतर दिल्ली पोलिसांच्या तपासाला आणखी वेग येऊ शकतो. कायदेतज्ज्ञांवर विश्वास ठेवला तर, आता दिल्ली पोलिसांना परिस्थितीजन्य पुराव्यांद्वारे गुन्हा सहज सिद्ध करता येणार आहे. पुढील अहवालाची प्रतीक्षा - पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फॉरेन्सिक तपास पथकाने याबाबत मौखिक माहिती दिल्ली पोलिसांना दिली आहे. त्याचवेळी, फॉरेन्सिक विभागाला संपूर्ण अहवाल तयार करून तो देण्यास काही दिवस लागू शकतात, असे बोलले जात आहे. फॉरेन्सिक टीमने पोलिसांना सांगितले की, त्यांना करवतीने मृतदेह कापल्याच्या खुणा आढळल्या आहेत. अशा स्थितीत पोलीस आता पुढील कारवाईसह सविस्तर अहवालाची प्रतीक्षा करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताब हा एका लबाड गुन्हेगारासारखे वागत आहे. आफताबची देहबोली पाहता त्याने एवढी घृणास्पद घटना घडवली असेल असे वाटत नाही. एवढा मोठा गुन्हा करूनही आफताबला कसलाही पश्चाताप नाही. तो सुरुवातीपासून अगदी सामान्यपणे वागत आहे. पूर्णपणे शांत आणि निश्चिंत दिसते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धाचा मारेकरी आफताब पोलिसांसोबत माईंड गेम खेळण्याचा प्रयत्न करत आहे.

आफताबला 12 नोव्हेंबरला अटक दिल्ली पोलिसांनी तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताबला 12 नोव्हेंबरला श्रद्धा वालकरच्या हत्येच्या आरोपाखाली अटक केली होती. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनावाला याने 18 मे रोजी संध्याकाळी श्रद्धा वालकर (27) हिचा खून केला आणि तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले, जे त्याने दक्षिण दिल्लीतील मेहरौली येथील त्याच्या निवासस्थानी सुमारे तीन आठवडे 300 लिटरच्या फ्रीजमध्ये ठेवले होते. तो अनेक दिवस दिल्लीच्या विविध भागात तिचे तुकडे फेकून देत होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या