JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / Shraddha murder case Update : श्रद्धाचे तुकडे फ्रीजमध्ये अन् आफताब दुसऱ्याच मुलीसोबत राहत होता घरात

Shraddha murder case Update : श्रद्धाचे तुकडे फ्रीजमध्ये अन् आफताब दुसऱ्याच मुलीसोबत राहत होता घरात

दिल्लीत काल (दि.14) मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. विकृत प्रियकराने आपल्या प्रेयसीची हत्या तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले आणि फ्रीजमध्ये ठेवले होते.

जाहिरात

दिल्लीत काल (दि.14) मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. विकृत प्रियकराने आपल्या प्रेयसीची हत्या तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले आणि फ्रीजमध्ये ठेवले होते.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 नोव्हेंबर : दिल्लीत काल (दि.14) मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. विकृत प्रियकराने आपल्या प्रेयसीची हत्या तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले आणि फ्रीजमध्ये ठेवले होते. गेल्या सहा महिन्यापासून पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते, अखेर पोलिसांनी या विकृती प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत. परंतु या विकृत प्रियकराच्या बाबतीत दुसरी एक धक्कादायक माहितीसमोर आली आहे. मृतदेहाचे ३५ तुकडे करणाऱ्या आफताबच्या संदर्भात आणखी एक खळबळजनक खुलासा समोर आला आहे. श्रद्धाच्या मृतदेहासमोर तो त्याच खोलीत दुसऱ्या मुलीसोबत अश्लील चाळे करत होता.

27 वर्षीय श्रद्धाच्या हत्येप्रकरणी चौकशीदरम्यान पोलिसांना नवी माहिती समोर आली आहे. श्रद्धाचा मृतदेह फ्रिजमध्ये असताना आरोपी आफताब त्याच खोलीत दुसऱ्या मुलीसोबत अश्लिल चाळे करत होता. आरोपी आफताबने श्रद्धाची निर्घृण हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले आणि काही आठवडे फ्रीजमध्ये ठेवले आणि नंतर ते तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी जंगलात फेकून दिल्याची माहिती समोर आली आहे.

खून करून मृतदेह फ्रीजमध्ये ठेवून आरोपी आफताब एका मुलीला डेट करत होता. एका मुलीला त्यानं डेटिंग अॅप द्वारे आपल्या घरी बोलावलं होतं. श्रद्धाचा मृतदेह फ्रिजमध्ये असतानाच हा त्याच घरात या मुलीसोबत राहत होता. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार श्रद्धाबरोबरच अनेक मुलींचे आफताबचे संबंध होते. आता दिल्ली पोलीस या सर्व मुलींचा तपास करत आहे. ज्या जंगलात मृतदेहाचे तुकडे फेकले तिथं पोलीस आफताबला घेऊन गेले आहेत. मृतदेहाचे अवशेष शोधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे.

संबंधित बातम्या

जाहिरात

काय आहे नेमकं प्रकरण?

दिल्लीमध्ये अंगावर शहारे आणणारी धक्कादायक घटना घडली आहे. या विकृत प्रियकराने आपल्या प्रेयसीची निर्घृणपणे हत्या केली. हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले आणि फ्रीजमध्ये ठेवले होते. गेल्या सहा महिन्यापासून पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते, अखेर पोलिसांनी या विकृती प्रियकराला बेड्या ठोकल्या आहे.  

हे ही वाचा :  कुख्यात गुंडाच्या बायकोची काढली छेड, तिने असा घेतला बदला की तरुणाचे कापले लिंग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताब असं या आरोपीचं नाव आहे. श्रद्धा असं मृत तरुणीचे नाव आहे. दोघांची भेट ही मुंबईतील एका कॉल सेंटरमध्ये झाली होती. दोघांमध्ये आधी मैत्री झाली त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले होते. दोघेही प्रेमात आकंठ बुडाले होते. त्यांनी कुटुंबीयांना माहिती दिली. पण, घरच्यांचा विरोध होत असल्यामुळे दोघेही दिल्लीला पळून गेले. दिल्लीमध्ये छतरपुर दोघे एकत्र राहत होते. श्रद्धाचे कुटुंबीय सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची विचारपूस करत होते.

जाहिरात

पण, अचानक श्रद्धाचा काही दिवसांपासून संपर्क होत नसल्यामुळे कुटुंबीयांना संशय बळावला. श्रद्धाचे वडील दिल्लीत पोहोचले आणि त्यांनी तिचा शोध घेतला पण काहीच पत्ता लागला नाही. त्यामुळे त्यांनी दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल केली.

त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पोलिसांना सुरुवातीला कोणतीची माहिती मिळाली नाही. पण पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. त्याच एका खबऱ्याकडून माहिती मिळाली आणि आफताबला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

जाहिरात

हे ही वाचा :  नवी मुंबई हादरली, दोन गटात तुफान हाणामारी, एकाचा जागीच मृत्यू

6 महिने मृतदेहाचे तुकडे फेकत होता

सुरुवातील आफताबने उडवाउडवीची उत्तरं दिली. पण पोलिसांनी खाक्या दाखवताच आफताबने गुन्ह्याची कबुली दिली. दिल्लीत आल्यावर श्रद्धाने लग्न करण्यासाठी तगादा लावला होता. त्यावरून आमच्यामध्ये भांडणं होत होती. मे महिन्यात आमच्यामध्ये असंच भांडणं झालं, त्यामुळे रागाच्या भरात तिचा खून केला. तिचा खून केल्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिच्या शरिराचे 35 तुकडे केले आणि जंगलामध्ये फेकून दिले, अशी कबुली आफताबने दिली.

जाहिरात

पोलिसांनी सांगितलं की, श्रद्धाचा गळा दाबून खून केला होता. त्यानंतर सुऱ्याने तिच्या शरिराचे 35 तुकडे केले. हे तुकडे ठेवण्यासाठी त्याने नवीन फ्रीज खरेदी केलं होतं. 18 दिवस त्याने श्रद्धाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले होते. रात्री 2 वाजता तो प्लास्टिकच्या पिशवीमध्ये तुकडे गोळा करत होता आणि बाहेर जाऊन फेकून येत होता. पोलिसांनी आफताब विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या