मुंबई, 3 नोव्हेंबर : शीना बोरा हत्याकांडात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. आता त्यात आणखी एकाची भर पडणार आहे. शीना बोरा आजही जिवंत आहे, असा दावा इंद्राणी मुखर्जीचे वकील रणजीत सांगळे यांनी केला आहे. राहुल मुखर्जी आणि शीना 24 एप्रिल 2012 नंतरही संपर्कात असल्याचे पुरावे आहेत. 24 एप्रिल नंतरही, श्यामवर रॉय आणी राहुल एकमेकांच्या संपर्कात असल्याचे पुरावे आहेत. तपासयंत्रणांनाही याचं उत्तर कोर्टासमोर द्यावं लागणार - आजपर्यंत कोणत्याही तपास यंत्रणा आणि कलम 164 अंतर्गत राहुलनं दिलेल्या जबाबात ही माहिती राहुलनं लपवल्याचे उलटतपासणीत उघड झाले आहे. हे महत्वाचं मला वाटलं नाही म्हणून तपास यंत्रणांना मी सांगितलं नाही, हे राहुलचं म्हणणं अनाकलनीय आहे, असेही रणजीत इंगळे म्हणाले. तसेच दोघांचे मेसेजेस आणि फोन कॉल रेकॉर्ड्स अखेर राहुल मुखर्जीनं कोर्टासमोर मान्य केले आहे. आता तपासयंत्रणांनाही याचं उत्तर कोर्टासमोर द्यावं लागणार आहे. शीना कुठे असेल हे राहुलच सांगू शकेल, कारण ते एकमेकांच्या संपर्कात होते. 24 एप्रिल 2012 नंतर ऑक्टोबर 2012 लाही ते संपर्कात असल्याचा पुरावा आहे. तसेच शिनासोबत लग्न झाल्याचं खोटं विवाह प्रमाणपत्रही राहुलनं बनवल्याचे उलटतपासणीत कोर्टात उघड झाले आहे. अनेक पुरावे समोर येताय म्हणून राहुल उत्तरं द्यायला टाळाटाळ करतोय. मला माहित नाही, मला आठवत नाही, असे उत्तरं तो देतोय, असा दावाही इंद्राणी मुखर्जीचे वकील रणजीत सांगळे यांनी केला आहे. हेही वाचा - शीना बोरा प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं? डिसेंबर 2021मध्ये इंद्राणीचं सीबीआयला हे पत्र - शीना बोरा हत्याकांड देशभरात चांगलंच गाजलं होतं. आता या प्रकरणी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. मात्र हा खुलासा या हत्ये प्रकरणातील मुख्य आरोपी आणि शीना बोराची आई इंद्राणी मुखर्जीनं केला आहे. आरोपी इंद्राणी मुखर्जीनं सीबीआयला एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात इंद्राणीनं केलेल्या दाव्यामुळे पुन्हा एकदा या प्रकरणात खळबळ माजली आहे. शीना बोरा जिवंत असल्याचा दावा इंद्राणीनं या पत्रात केला आहे. इतकंच नाही तर शीनाला काश्मीरमध्ये एका महिलेनं पाहिल्याचंही तिनं म्हटलं आहे.