JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / 'माझा पती चारित्र्यहीन, तो...'; PWD अधिकाऱ्याला 13 लाखाची लाच घेताना रंगेहाथ पकडताच पत्नीचा धक्कादायक खुलासा

'माझा पती चारित्र्यहीन, तो...'; PWD अधिकाऱ्याला 13 लाखाची लाच घेताना रंगेहाथ पकडताच पत्नीचा धक्कादायक खुलासा

यगदत्त विधुवा नावाच्या एका PWD विभागातील अधिकाऱ्याला (Pali PWD officer arrested) एसीबीने 13 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 13 एप्रिल : लाचखोर अधिकारी अँटिकरप्शन ब्युरोच्या (ACB) जाळ्यात अडकल्याच्या कित्येक बातम्या आपण पाहतो. मात्र, तरीही कितीतरी सरकारी बाबू आपल्याला काही होणार नाही अशा भ्रमात राहत असतात. राजस्थानमध्ये अशाच एका लाचखोर अधिकाऱ्याला पकडण्यात एसीबीला (Rajasthan corrupt PWD officer) यश आलं आहे. उदयपूर अँटिकरप्शन ब्युरोच्या (ACB) पथकाने पालीमध्ये ही कारवाई केली. यगदत्त विधुवा नावाच्या एका PWD विभागातील अधिकाऱ्याला (Pali PWD officer arrested) एसीबीने 13 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं. बिल पास करण्यासाठी मागितली लाच मिळालेल्या माहितीनुसार, यगदत्त विधुवा हा पाली NHIDCLचा एक्सईएन (XEN) आहे. हा अधिकारी आपल्याकडून लाच मागत असल्याची तक्रार ब्यावर-गौमती परिसरातील पॅकेज-2 या प्रकल्पाचे मॅनेजर विमल कुमार यांनी दाखल केली होती. पाली नॅशनल हायवेवर (Pali officer caught taking bribe) या कंपनीचा 188 कोटी रुपयांचा प्रोजेक्ट सुरू आहे. यासाठी कंपनीची 75 लाख रुपयांची हँड रिसिट रिलीज करण्यासाठी यगदत्तने लाच (PWD officer caught taking bribe of 13 lakh rupees) मागितली होती. दैनिक भास्करने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. 50 मुलींसोबत संबंध; दोघींची हत्या आणि सामूहिक बलात्कार; अटकेनंतर आरोपीचे धक्कादायक खुलासे या पूर्वीही घेतले होते पैसे आणि महागड्या वस्तू प्रोजेक्ट मॅनेजर विमल कुमारने दिलेल्या माहितीनुसार, यगदत्तने यापूर्वीही त्याच्याकडून विविध गोष्टींची मागणी केली होती. बिल पास करुन देण्यासाठी आणि कामात अडथळा आणू नये म्हणून यापूर्वी यगदत्तने अ‍ॅपल कंपनीचा महागडा लॅपटॉप, म्हणजेच मॅकबुकही (MacBook seized from PWD officer) मागितला होता. तसंच, यापूर्वी वेळोवेळी त्याने पैसेही मागितले होते. जसंजसं विमल कुमार त्याच्या मागण्या पूर्ण करत होता, तसंतसं यगदत्तची हाव वाढत गेली. अखेर विमल कुमारने एसीबीकडे धाव घेत, यगदत्त विरोधात तक्रार दाखल केली. पत्नीने केले चारित्र्याबद्दल आरोप यगदत्तला ताब्यात घेतल्यानंतर एसीबीचे पथक त्याच्या जयपूरमधील घरी गेले. यावेळी यगदत्तच्या पत्नीने आपण त्याच्याशी चार वर्षांपूर्वीच संबंध तोडल्याचं सांगितलं. सध्या त्यांच्या घटस्फोटाची केस कोर्टात सुरू (Rajasthan PWD officer bribe) असल्याचंही तिने स्पष्ट केलं. यासोबतच यगदत्तच्या पत्नीने आपला पती चारित्र्यहीन असल्याचंही म्हटलं. एसीबीच्या अधिकाऱ्यांना या घरातून कोणतंही महत्त्वाचं सामान मिळालं नाही. अखेर 10 वर्षांनंतर महिलेनं पाहिलं बाहेरचं जग, चारित्र्याच्या संशयानं ठेवलं होतं डांबून असा अडकला जाळ्यात विमल कुमारने एसीबीकडे तक्रार दाखल केल्यानंतर त्यांनी विमलला यगदत्तने सांगितल्याप्रमाणे करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार विमल कुमार यगदत्तने मागितलेले 13 लाख रुपये घेऊन हायवेवर असलेल्या पणिहरी हॉटेलमध्ये बोलवले. या ठिकाणी यगदत्तने मॅनेजर विमलकडून पैसे घेताच एसीबीच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या