JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / धक्कादायक! ऑनलाईन रमीच्या व्यसनात गमावले पैसे, पुण्यात नैराश्यातून युवकाची आत्महत्या

धक्कादायक! ऑनलाईन रमीच्या व्यसनात गमावले पैसे, पुण्यात नैराश्यातून युवकाची आत्महत्या

एका तरुणाला मोबाईलवर ऑनलाईन रमी खेळण्याचे व्यसन लागले होते. त्यातून हा तरुण मोठी रक्कम हरल्याने तो कर्जबाजारी झाला होता.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 17 ऑगस्ट : आजकाल अनेक जणांना ऑनलाईन रमी खेळण्याचे व्यसन लागले आहे. या ऑनलाईन रमीचे विविध परिणाम समोर येत आहे. पुण्यातून याच ऑनलाईन खेळाशी संबंधित एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑनलाईन रमीच्या व्यसनातून पैसे हरल्याने युवकाने आत्महत्या केली आहे. या घटनेने एक खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - एका तरुणाला मोबाईलवर ऑनलाईन रमी खेळण्याचे व्यसन लागले होते. त्यातून हा तरुण मोठी रक्कम हरल्याने तो कर्जबाजारी झाला होता. यामुळे नैराश्यात आलेल्या तरुणाने आत्महत्या केली. ही घटना राजगुरुनगर येथे घडली. शेखर रमेश सुक्रे असे 22 वर्षीय आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो राजगुरूनगर येथील ब्राह्मणआळी येथील रहिवासी होता. पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, शेखर सुक्रे हा 31 जुलैला घरातून निघून गेला होता. यानंतर पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, मंगळवारी राजगुरूनगर परिसरातील निर्जनस्थळी झाडाला लटकलेल्या अवस्थेत शेखर सुक्रे या तरुणाचा मृतदेह आढळून आला. हेही वाचा -  रिल्स बनविण्यासाठी हवा होता मोबाईल, अल्पवयीन मुलाने थेट महिलेवरच.. आरोपीला बेड्या शेखर सुक्रे याला मोबाईलद्वारे ऑनलाईन रमी खेळण्याचा व्यसन असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे यातूनच तो कर्जबाजारी झाला होता. नैराश्येतून त्याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, याबाबत मृत शेखर सुक्रे युवकाचा भाऊ याने खेड पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. या प्रकरणाचा पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या