JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / परराज्यातील तरुणीकडून हॉटेलवर वेश्या व्यवसाय, उस्मानाबादेत 2 हॉटेलवर 4 मुलींची सुटका

परराज्यातील तरुणीकडून हॉटेलवर वेश्या व्यवसाय, उस्मानाबादेत 2 हॉटेलवर 4 मुलींची सुटका

उस्मानाबाद शहरातील सरिता हॉटेल आणि बावर्ची हॉटेल इथं ही कारवाई करण्यात आली

जाहिरात

फाईल फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

उस्मानाबाद, 18 सप्टेंबर : उस्मानाबादमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनामध्ये वाढ होताना दिसत आहे. शहरातील एका हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय करणाऱ्या रॅकेटचा उस्मानाबाद पोलिसांनी भांडाफोड केला आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी 4 मुलींची सुटका केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद शहरातील सरिता हॉटेल आणि बावर्ची हॉटेल इथं ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी ही धडक कारवाई केली. यावेळी या दोन्ही हॉटेलवर पोलिसांनी धाड टाकून रंगेहात पकडले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. पोलिसांनी या कारवाई 5 मुलींची सुटका केली आहे, त्यापैकी 4 जणी सरिता हॉटेल आणि एक मुलगी बावर्ची हॉटेल इथं सापडली आहेत. सुटका केलेल्या महिलेतील 1 महिला उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी येथील असून इतर मुली परराज्यातील आहेत. दोन्ही ठिकाणी एक एक आरोपीला अटक केले असून पोलीस तपास सुरू आहे. (स्पा पार्लरमध्ये देहविक्रीचा धंदा, पोलिसांचा छापा पडताच आपत्तीजनक अवस्थेत सापडले तरुण-तरुणी) हे दोन्ही आरोपी परराज्यातील आहे. हे आरोपी मुलींना या हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय करुन घेत होते. अपर पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्या पथकाने ही कारवाई केली असून हा व्यवसाय करणारे पर-राज्यातील आरोपी असून याचे कनेक्शन राज्याबाहेर असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यादृष्टीने पोलीस तपास सुरू केले असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या