JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / भाजप नेत्याच्या रिसॉर्टमध्ये देहविक्रय व्यवसाय; पोलिसांच्या छापेमारीत 6 मुलं ताब्यात, 73 अटक

भाजप नेत्याच्या रिसॉर्टमध्ये देहविक्रय व्यवसाय; पोलिसांच्या छापेमारीत 6 मुलं ताब्यात, 73 अटक

आतापर्यंत या प्रकरणात 73 जणांना अटक करण्यात आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

शिलाँग, 24 जुलै : मेघालयमधील वेस्ट गारो हिल जिल्ह्यात पोलिसांनी भाजप नेताच्या रिसॉर्टमध्ये छापेमारी करताना देहविक्रय व्यवसाय सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पोलीस अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की, या रिसॉर्टमध्ये अनैतिक कामं केली जात होती. पोलिसांच्या टीमने या छापेमारीत 6 मुलांना ताब्यात घेतलं आहे. याशिवाय 73 लोकांना अटक केली आहे. हा आरोपी भाजप प्रदेशचा उपाध्यक्ष असल्याचं सांगितलं जात आहे. तो सध्या फरार आहे. त्याला पकडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या प्रकरणात प्रदेश भाजपकडून अद्याप कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मेघालयच्या वेस्ट गारो हिल जिल्ह्यात पोलिसांना सूचनेच्या आधारावर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बर्नार्ड एन मारक यांच्या एका रिसॉर्टवर छापेमारी केली होती. या छापेमारीत 6 मुलं बंद खोलीत आढळली. मुलांची अवस्था दयनीय असल्याचं सांगितलं जात आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये 4 मुलं आणि 2 मुलींचा समावेश आहे. पोलिसांनी मुलांची चौकशी केली याशिवाय रिसॉर्टमध्ये मिळालेल्या पुराव्यांनुसार येथे देहविक्रय व्यवसाय सुरू असल्याचं समोर आलं. आता पोलिसांनी या प्रकरणात 73 जणांना अटक केली आहे. 400 दारुच्या बाटल्या, 500 कंडोम मिळाले… पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रिसॉर्टमध्ये छापेमारीदरम्यान पोलिसांच्या टीमला 400 दारूच्या बाटल्या आणि 500 कंडोमची पाकिटं मिळाली. रिसॉर्टचा मालक बर्नार्ड एन मारक गारो हिल स्वायत्त जिल्हा परिषदेचा एक निर्वाचित सदस्य आहे. याशिवाय प्रदेश भाजप उपाध्यक्ष आहे. पोलिसांनी या प्रकरणात पोक्सो अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आणि आरोपीचा शोध घेत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या