JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार, विद्यार्थिनीचा प्राध्यापकावर आरोप; घटनेने खळबळ

लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार, विद्यार्थिनीचा प्राध्यापकावर आरोप; घटनेने खळबळ

गुरु आणि शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कांगडा, 19 नोव्हेंबर : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहेत. बलात्कार, हत्येच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांड नुकतेच समोर आले आहे. या घटनेनंतर देशात खळबळ उडाली आहे. ही घटना ताजी असतानाच आणखी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका प्राध्यापकाने आपल्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याच्या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - हिमाचल प्रदेशच्या सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये गुरु आणि शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे एका विद्यार्थिनीने प्राध्यापकावर बलात्काराचा आरोप केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अद्यापपर्यंत आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, कांगडातील देहरा येथे केंद्रीय विद्यापीठाचे कॅम्पस आहे. येथे शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने तिच्याच शिक्षकावर बलात्काराचा आरोप केला आहे. दुसर्‍या राज्यातील पीडित विद्यार्थिनीने शुक्रवारी संध्याकाळी पोलिसांत तक्रार दिली आणि प्रोफेसरने लग्नाच्या बहाण्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला. ही विद्यार्थिनी सेंट्रल युनिव्हर्सिटी डेहरा कॅम्पसमध्ये शिकते. तसेच हा प्राध्यापकही येथे शिकवतो. हेही वाचा -  धक्कादायक! आधी लग्नाचे आमिष नंतर अत्याचार, धर्मांतरासाठी तरुणीवर दबाव असे सांगितले जात आहे की, दोघे पूर्वी बराच वेळ फोनवर बोलत होते. याशिवाय व्हॉट्सअॅपवर चॅटिंगही व्हायचे. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढली आणि प्राध्यापकाने तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासनही दिले. विद्यार्थिनी तिच्या प्राध्यापकाशी भावनिक जोडली गेली. दरम्यान, अजून देहरा पोलिसांनी आरोपी प्राध्यापकाला अटक केलेली नाही. डीएसपी देहरा विशाल वर्मा यांनी सांगितले की, काल संध्याकाळी एक तक्रार आली आहे, यात एका विद्यार्थिनीने सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापकावर बलात्काराचा आरोप केला आहे. सध्या पोलीस तपासात गुंतले आहेत. पोलिसांनी आयपीसी 376, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या