JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / महाराष्ट्रात भाजप सरकार होतं त्यावेळी भोंगे का हटविले नाही? प्रवीण तोगडियांचा सवाल

महाराष्ट्रात भाजप सरकार होतं त्यावेळी भोंगे का हटविले नाही? प्रवीण तोगडियांचा सवाल

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात भोंगे हटविण्यासाठी मोहीम सुरू झाली आहे. मात्र, हे भोंगे आजपासून नाहीत. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार भोंगे संदर्भात न्यायालयाचा निर्णय आहे. मात्र, महाराष्ट्रात भाजपचे (Maharashtra Bjp) राज्य असताना भोंगे का हटविले नाही? असा सवाल आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया (Pravin Togadiya) यांनी केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 19 एप्रिल : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात भोंगे हटविण्यासाठी मोहीम सुरू झाली आहे. मात्र, हे भोंगे आजपासून नाहीत. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार भोंगे संदर्भात न्यायालयाचा निर्णय आहे. मात्र, महाराष्ट्रात भाजपचे (Maharashtra Bjp) राज्य असताना भोंगे का हटविले नाही? असा सवाल आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया (Pravin Togadiya) यांनी केला आहे. Pok मध्ये संघाच्या शाखा लावा ‘आताही ज्या राज्यात भाजपची सरकार आहे, त्या राज्यात जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देऊन नियमानुसार भोंगे का हटवित नाही’, असेही ते म्हणाले. ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी 15 वर्षात अखंड भारत होईल, असे म्हटले आहे. मी त्यांचे स्वागत आणि समर्थन करतो. मात्र, सत्तेमध्ये असताना वचन दिलं जातं. सत्ता आणि सेना असताना काहीही करता येते. एका महिन्यात काश्मिरी पंडितांसाठी घरे आणि त्यांच्यासोबत राहा. Pokमध्ये संघाच्या शाखा लावा. मी स्वतः शाखेत नमस्ते सदा वस्तले करायला येईल’, असेही ते म्हणाले. हे वाचा -  ‘‘रावणाने सीतेचं अपहरण करून काही गुन्हा केला नाही’’, भाजप आमदाराच्या वादग्रस्त वक्तव्याचा VIDEO हिंदूंनी काळजी घ्यावी ‘पाकिस्तानमध्ये घुसा आणि मोहन भागवत स्वतः टॅंक घेउन जा, मी स्वतः ते टॅंक स्वच्छ करील. जेव्हा हिंदुंच्या रॅलीवर दगडफेक झाली तेव्हा इंटेलिजन्स फेल झाली. जिहादी यांची हिम्मत वाढली. निवडणुका येत आहेत. महागाई, शेतकरी, बेरोजगारी यांच्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी हा कट तर नाही ना? कारण दंगे झाले तर मुसलमान आणि हिंदू सुद्धा मरतील. त्यामुळं निवडणुका जिंकण्यासाठी दंगे भडकविण्यासाठी हे राजकीय षडयंत्र तर नाही ना? त्यामुळं हिंदूंनी काळजी घ्यावी, त्यामुळं रोजगार द्यावा. पोलिसांनी अहवाल दिला असेल तर हिंदूंनी सावधान असले पाहिजे, आम्ही कोणासाठी गोळी खाऊन कोणाला सत्ता भोगू देऊ नका’, असेही तोगडिया म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या