JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या सर्व्हर रुमवर 'सायबर हल्ला', 5 कोटींचे नुकसान

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या सर्व्हर रुमवर 'सायबर हल्ला', 5 कोटींचे नुकसान

हा प्रकार 26 फेब्रुवारी 2021 रोजी घडला आणि या प्रकरणी मंगळवारी तक्रार देण्यात आली त्यानंतर घटना उजेडात आली.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पिंपरी चिंचवड, 10 मार्च : पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या (Pimpri Chinchwad Smart City project) सर्व्हर रूममध्ये (server room) जाऊन एका अज्ञात व्यक्तीने तब्बल 27 सर्व्हरवरील अतिशय महत्वपूर्ण डेटा इन्क्रीप्ट (Data encrypt) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराने एकच खळबळ उडाली असून 100 कोटींपेक्षा जास्त खर्च करून विकास प्रकल्प राबविणारी स्मार्ट सिटी ही संस्था नागरिक आणि प्रकल्पासंदर्भातील गोपनीय माहितीही सुरक्षित ठेऊ शकत नाही का? असा सवाल उपस्थित केल्या जातोय. या प्रकरणी टेक महिंद्राचे प्रोग्राम (Tech Mahindra’s program) मॅनेजर महेंद्र लाठी यांनी तक्रार दिल्यानंतर अज्ञाता विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती सायबर विभागाकडून देण्यात आली आहे. सोलापूरमधील पालकांसाठी महत्त्वाची बातमी, जि.प.शाळांबद्दल प्रशासनाची मोठी घोषणा पोलिसांकडे प्राप्त तक्रारीनुसार, हा प्रकार 26 फेब्रुवारी 2021 रोजी घडला आणि या प्रकरणी मंगळवारी तक्रार देण्यात आली त्यानंतर घटना उजेडात आली. पण एवढे दिवस ही माहिती का लपवून ठेवण्यात आली या बाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या सर्व प्रकारात तब्बल 5 कोटींचे नुकसान झाल्याचं ही तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे नेमका कोणता आणि किती महत्वाचा डेटा इन्क्रीप्ट( नासधूस) केला गेला याची पूर्णतः माहिती अद्यापही गुलदस्त्यात आहे. हरियाणातील भाजपा सरकार वाचणार की जाणार?मुख्यमंत्री खट्टर यांच्या टेन्शनमध्ये वाढ दरम्यान, या प्रकरणी स्मार्ट सिटी प्रकल्पाचे अधिकारी नीलकंठ पोमण यांना विचारलं असता या घटनेशी महापालिकेचा काहीही संबध नाही,तक्रार देणाऱ्या संबंधित संस्थेकडे डेटा इन्स्टॉलेशनच ठेका आहे, तेच काम करत असताना हा सायबर हल्ला झाला असल्याची माहिती मिळाल्याचं पोमण म्हणाले. इन्क्रीप्ट झालेला डेटाही महत्वपूर्ण नसल्याचा दावा पोमण यांनी केला आहे. तर या घटनेत 5 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं टेक महिंद्राने स्पष्ट केले आहे.  त्याबाबत विचार करू, असं पोमण म्हणाले. त्यामुळे या प्रकरणी आता कुणावर कारवाई होते का याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या