JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / पत्नीनं प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, घराचं काम करताना कामगारांना सापडला सांगाडा

पत्नीनं प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, घराचं काम करताना कामगारांना सापडला सांगाडा

31 वर्षीय हरबीरसिंग यांच्या घरात खोदकाम करत असताना सांगाडा सापडला, त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पानिपत, 27 ऑक्टोबर : हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यात 18 महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या एका तरुणाचा मृतदेह त्यांचा घरातच सापडला. 31 वर्षीय हरबीरसिंग यांच्या घरात खोदकाम करत असताना सांगाडा सापडला, त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. असा आरोप आहे की, पत्नीनेच पतीला ठार मारले त्यानंतर त्याचा मृतदेह घरातच गाडला. एवढेच नाही तर, पती गायब झाल्याची बनावट कहाणी रचत एका तांत्रिककडे गेली होती. तांत्रिकाकडे गेल्यानंतर पत्नीनं नवऱ्याला शोधून आणण्यास सांगितले. यावर तांत्रिकानेदोन क्विंटल दूध आणि दहा हजार रुपये मागितले. दरम्यान हे प्रकरण पोलिसांकडे गेल्यानंतर त्यांनी पत्नी गीताची चौकशी केली. गीतानं पोलीस चौकशीत मान्य केले, घरातच हरबीरसिंगचा सांगाडा सापडला. वाचा- शेवटचा पेपर देऊन आनंदात बाहेर आली, आईला भेटणार तेवढ्यात मागून युवकानं घातली गोळी पोलिसांनी गीताला दोन दिवसांच्या पोलीस कोठडी सुनावली आहे. गीता प्रियकर विकास याचा शोध घेण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टॉवर कंपनीत तंत्रज्ञ असलेल्या हरबीरने पत्नी गीताला त्याचाच मित्र विकाससोबत आक्षेपार्ह परिस्थितीत पाहिले. दारूच्या नशेत हरबीरने गीताला मारहाण केली होती. विकासला धमकी देण्यात आली होती. वाचा- पुण्यातील लॉजमधील ‘धक्कादायक’ प्रकार पाहून पोलिसही चक्रावले, नंतर घडलं असं… असा रचला हत्येचा कट विकासनं हरबीरची हत्या करण्याचा कट रचला होता. यानंतर दोघांचे लग्न होईल, असा निर्णय घेण्यात आला होता. दोघांनी हरबीरचे हात व पाय बांधले आणि गळा आवळून त्याला ठार मारले. पाण्याचा निचरा करण्यासाठी यापूर्वी खणलेल्या खड्ड्यात मृतदेह टाकण्यात आला होता आणि त्याला पुरण्यात आले. हरबीरचा मोबाइल बंद करून जवळच्या शेतात फेकून दिले. हरबीरच्या घरातल्यांना शंका आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या