प्रातिनिधिक छायाचित्र
पालघर, 18 डिसेंबर : पालघर जिल्ह्यातील सामूहिक बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देश हादरुन गेला आहे. एका तरुणाने त्याच्या काही साथीदारांसह आपल्याच अल्पवयीन मैत्रिणीवर अतोनात अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पालघर पोलिसांनी सामूहिक बलात्काराच्या आरोपाखाली 8 जणांना अटक केली आहे. पोलिसांनी रविवारी सांगितले की, बलात्काराची ही घटना 16-17 डिसेंबरच्या मध्यरात्री घडली. आरोपींनी आधी पीडितेवर एका निर्जन बंगल्यात बलात्कार केला आणि नंतर तिला समुद्रकिनारी नेऊन तिच्यावर पुन्हा अत्याचार केला. पालघर जिल्ह्यातील सातपाटी ग्रामीण पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले की, सर्व आरोपींविरुद्ध सामूहिक बलात्कारासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 16 डिसेंबर रोजी रात्री 8 ते 17 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत आरोपींनी तिच्यावर अत्याचार केल्याचे तरुणीने लेखी तक्रारीत पोलिसांना सांगितले. आरोपींनी तिला माहीम गावातील एका निर्जन बंगल्यात नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला. त्यानंतर समुद्रकिनारी झुडपात नेऊन पुन्हा अत्याचार केला. वाचा - पत्नीशी वाद, पतीने चिमुकल्याला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं; नंतर स्वत:ही मारली उडी या कलमान्वये आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल पोलिसांनी सांगितले की, तरुणीच्या तक्रारीच्या आधारे रविवारी सकाळी आठही आरोपींना अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कलम 376 (डी), कलम 366 (अ), कलम 341, कलम 342, कलम 323 आणि पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपींची चौकशी सुरू आहे. दरम्यान, सातपाटी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील आठही आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांना पालघर न्यायालयात हजर करण्यात आले होते.
काय आहे घटना? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सतरा डिसेंबरला दुपारी दोनच्या सुमारास पीडितेच्या वडिलांनी आपली मुलगी काल रात्रीपासून बेपत्ता असल्याची तक्रार सातपाटी पोलीस ठाण्यात दिली होती. तसेच तीला फोन लावला असता ती फोनवर फक्त रडते अशी माहिती दिली होती. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तपासाची सूत्रे गतीमान केली. त्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच या मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलं. पोलिसांनी या अल्पवयीन मुलीला हरणवाडी परिसरातून ताब्यात घेतलं. पीडितेच्या मित्राने तिला माहीम परिसरातील पानेरी येथे बंद असलेल्या एका बंगल्यामध्ये बोलावून घेतले. त्यानंतर त्याच्यासह त्याच्या मित्रांनी या मुलीवर बलात्कार केला. या आठही जणांना सातपाटी सागरी पोलिसांनी अटक केली आहे.