JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / Pak Lockdown: ‘सरबत’मध्ये साखर जास्त टाकल्याचा राग, आरोपीने केली सख्या बहिण-भावाची हत्या

Pak Lockdown: ‘सरबत’मध्ये साखर जास्त टाकल्याचा राग, आरोपीने केली सख्या बहिण-भावाची हत्या

लहान भाऊ भांडण सोडवायला आला. तो मध्ये पडल्याने मोठ्या भावाने धार धार शस्त्राने त्याची हत्या केली आणि एवढ्यावरच न थांबता त्याने बहिणीचीही हत्या केली.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पेशावर 04 मे : लॉकडाऊनमुळे घरातच असलेल्या लोकांच्या मानसिकतेवरही परिणाम होत असल्याचं दिसून येत आहे. लोकांचा संयम सुटत असून त्यामुळे लहान-सहान गोष्टींवर ते आक्रमक होत आहेत. पाकिस्तानमध्ये केवळ सरबतात साखर जास्त झाली म्हणून भावाने आपल्याच बहिण आणि भावाची हत्या केली. खैबर पख्तूनख्वा (Khyber Pakhtunkhwa)ची राजधानी पेशावरमध्ये ही घटना घडली आहे. ‘डेली औसाफ’ने ही बातमी दिली आहे. मोठ्या भावाने आपल्या बहिणीला सरबत करायला सांगितलं. तिने सरबत करून आणल्यानंतर त्यात साखर जास्त असल्याचं भावाला जाणवलं. या शुल्लक कारणावरून त्याने बहिणीशी वाद घातला. त्या दोघांमध्ये भांडण सुरू झालं. तेवढ्यात त्याचा लहान भाऊ भांडण सोडवायला आला. तो मध्ये पडल्याने मोठ्या भावाने धार धार शस्त्राने त्याची हत्या केली आणि एवढ्यावरच न थांबता त्याने बहिणीचीही हत्या केली. या घटनेनंतर आरोपी भाऊ फरार झाला असून त्याला पकडण्यासाठी पोलीस पथकं तयार करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. एका शुल्लक कारणामुळे सर्व कुटुंबच उद्धवस्त झाल्याने स्थानिक नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. हेही वाचा - PPE किट मिळत नसल्याची सरकारवर टीका, 2 डॉक्टरांचा खिडकीतून पडून संशयास्पद मृत्यू चीननं असा पसरवला जगभरात कोरोना, अमेरिकेला मिळाला सर्वात मोठा पुरावा …तर वर्षाअखेरीस मिळणार कोरोनाची लस, ट्रम्प यांचा सर्वात मोठा दावा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या