भुवनेश्वर, 15 फेब्रुवारी: डॉक्टर असल्याची बतावणी करून एका व्यक्तीने सात राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 14 महिलांची फसवणूक (Duped) केल्याची घटना उघडकीस आली आहे. या व्यक्तींनं 14 महिलांशी लग्न करून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले आहेत. रमेश स्वैन (Ramesh Swain) असं या व्यक्तीचं नाव आहे. त्याच्या सातव्या पत्नीनं तक्रार केल्यानंतर ओडिशातील (Odisha) भुवनेश्वर येथील खंडगिरी येथून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. रमेश स्वैनचं पहिलं लग्न 1982 मध्ये केंद्रपारा येथे झालं होतं. 2002 मध्ये त्यानं दुसरं लग्न केलं. त्यानंतर त्यानं मॅट्रिमोनियल वेबसाइटवर (Matrimonial Website) स्वत:चं प्रोफाईल ओपन केलं. आपण अविवाहित (Unmarried) असल्याची खोटी माहिती त्यानं साईटवर दिली. तो आपलं जॉब स्टेटससुद्धा कधी डॉक्टर (Doctor) तर सरकारी अधिकारी असं सांगायचा. मॅट्रिमोनियल साईटचा वापर करून त्यानं उच्चभ्रू कुटुंबातील महिलांना टारगेट केलं. अशाच पद्धतीनं त्यानं आतापर्यंत 14 लग्न केली आहेत. लग्नाच्या काही दिवसांनंतर तो महिलांचे पैसे घेऊन पळून जात असे. या आरोपीनं आतापर्यंत ओडिशातील तीन, पंजाब, झारखंड, आंध्र प्रदेश, आसाम आणि छत्तीसगडमधील प्रत्येकी एका महिलेशी लग्न केलं आहे. तर, दिल्ली आणि मध्य प्रदेशात प्रत्येकी दोन लग्न केली आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. हे वाचा- बुरखा घालून टाकला परफेक्ट दरोडा; पण यामुळे झाला गजाआड, पळवला होता लाखोंचा ऐवज स्वैनचे सर्व कारनामे त्याच्या सातव्या पत्नीच्या लक्षात आले. तिनं जुलै 2021मध्ये खंडगिरी पोलीस स्टेशनमध्ये (Khandagiri Police Station) एफआयआर (FIR) दाखल केला होता. ते दोघे मॅट्रिमोनियल वेबसाइटवर भेटले होते. त्यांनी लग्न केलं आणि नंतर भुवनेश्वरमध्ये राहिले. लग्नानंतर काही दिवसांतच तो पैसे आणि दागिने घेऊन पळून गेला. नंतर एका मॅट्रिमोनियल वेबसाइटवर त्याचा फोटो त्याच्या पत्नीला दिसला. त्यानंतर तिनं एफआयआर दाखल केला, असं तक्रारीत म्हटलं आहे. भुवनेश्वरचे पोलीस उपायुक्त (DCP) उमाशंकर दास (Umashankar Das) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आरोपीविरोधात भुवनेश्वर पोलीस हद्दीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पहिल्या दोन बायकांपासून पाच मुलं आहेत. वेगवेगळ्या मॅट्रिमोनिअल साइट्सच्या माध्यमातून त्याने मध्यमवयीन अविवाहित नोकरदार महिलांना टारगेट केलं आहे. वकील(Lawyers), डॉक्टर (Doctors) आणि इतर उच्चशिक्षित महिला त्याच्या जाळ्यामध्ये (Victims) अडकलेल्या आहेत. स्वैन या महिलांचा विश्वास संपादन करायचा आणि पैसे व मौल्यवान वस्तू घेऊन त्यांना सोडून द्यायचा. त्याला हव्या होत्या तशा महिलांना टारगेट करण्यासाठी त्यानं अनेक ठिकाणी प्रवास केला. आतापर्यंत तो आसाममधील गुवाहाटी येथील पत्नीसोबत सर्वात जास्त काळ राहिला आहे.’ हे वाचा- पुणे: मुलाचं अभ्यास न करणं आईच्या जीवावर बेतलं, विवाहितेनं गळफास घेत संपवलं जीवन रमेश स्वैन हा डॉक्टर किंवा सरकारी अधिकारी (Government Officer) नाही, तरीदेखील त्यानं आपल्या वाहनावर सरकारी कर्मचारी असल्याचं स्टिकर लावलं होतं. तो अनेक राज्यांमध्ये आलिशान फ्लॅटमध्ये रहायचा, असं पोलिसांनी सांगितलं. स्वैनला यापूर्वी दोनदा अटक करण्यात आली होती. 2006 मध्ये केरळमधील एर्नाकुलम (Ernakulam) येथे त्याला अटक करण्यात आली होती. त्याच्यावर 13 बँकांची 1 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप होता. त्यानंतर 2011मध्ये त्याला हैदराबादमधून अटक करण्यात आली होती. तिथे त्याच्यावर बेरोजगार तरुणांना नोकरी देण्याच्या बहाण्यानं 2 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप होता.